नाशिक : मध्यवर्ती मार्केट परिसर सीसीटीव्ही कक्षेत आणण्यासाठी येथे भूमीपूजन करताना भद्रकालीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे. समवेत मार्केटचे अध्यक्ष चेतन शेलार आदी पदाधिकारी. (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक : मध्यवर्ती मार्केट परिसर सीसीटीव्ही कक्षेत आणण्यासाठी येथे भूमीपूजन करताना भद्रकालीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे. समवेत मार्केटचे अध्यक्ष चेतन शेलार आदी पदाधिकारी. (छाया: हेमंत घोरपडे)

नाशिक सेंट्रल मार्केट आता सीसीटीव्हीच्या निगराणीत; भूमीपूजन कार्यक्रम

नाशिक: पुढारी ऑनलाईन डेस्क

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून भद्रकाली परिसरात नाशिक मध्यवर्ती मार्केट (Nashik Central Market) परिसरात आता सीसीटीव्ही (cctv) च्या माध्यमातून नासिक पोलीस आयुक्तालयाची नजर संपूर्ण जिल्हाभरातून येणाऱ्या व्यापारी व नागरिकांवर राहणार आहे. याकरीता भद्रकालीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या हस्ते मार्केट परिसरात सीसीटीव्ही बसविणे कामी भूमीपूजन करण्यात आले.

नाशिक मध्यवर्ती मार्केट परिसरात व्यापारासाठी व विविध खरेदीसाठी नागरिकांचे ये-जा असते. त्यांच्या सुरक्षतेसाठी व कायदा सुव्यवस्थेवर अंकुश राहण्यासाठी नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे यांच्या सहकार्याने नाशिक मध्यवर्ती मार्केट (Nashik Central Market) ला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून  एकूण चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे कामी भूमीपूजन करण्यात आले. याप्रसंगी भद्रकालीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे, स्मार्ट सिटी चे अधिकारी व नसिक सेंट्रल मार्केटचे अध्यक्ष चेतन शेलार , निलेश शेलार , विजय जाधव , योगेश बकरे , मुज्जू शेख व परिसरातील नागरिक परिसरातील व्यापरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news