Nanded Crime | तिहेरी हत्याकांडाने नांदेड हादरले! बोरीत पतीकडून गर्भवती पत्नीसह मुलीचा गळा दाबून खून

Nanded Crime | तिहेरी हत्याकांडाने नांदेड हादरले! बोरीत पतीकडून गर्भवती पत्नीसह मुलीचा गळा दाबून खून
Published on
Updated on

माळाकोळी (जि. नांदेड), पुढारी वृत्तसेवा : माळाकोळी पोलीस स्थानक हद्दीत असलेल्या बोरी (तालुका कंधार) येथील भारतीय सैन्यात जवान असलेल्या एकनाथ मारुती जायभाय (३२ वर्षे) याने त्याच्या गर्भवती पत्नीसह मुलीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना त्याच्या बोरी येथील घरी बुधवारी सकाळी ६ वाजता घडल्याचे उघड झाले असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nanded Crime)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बोरी (तालुका कंधामाळाकोळीर) येथील एकनाथ जायभाय हा राजस्थान बिकानेर येथे कर्तव्यावरून गावी सुट्टीवर आला असताना त्याने पत्नी भाग्यश्री एकनाथ जायभाय (वय २२), तर मुलगी सरस्वती एकनाथ जायभाये (वय ४) यांचा खून केला. धक्कादायक बाब म्हणजे त्याची पत्नी भाग्यश्री ही आठ महिन्याची गर्भवती असल्याचे समजते.

हे कृत्य केल्यानंतर आरोपी एकनाथ जायभाय याने स्वतः पत्नीच्या बहिणीला फोनवरून कळविले आणि तो स्वतः माळाकोळी पोलीस स्थानकात हजर झाला. त्याची मृत पत्नी, मुलगी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी माळाकोळी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आणणण्यात आला आहे. (Nanded Crime)

सदरील घटनेचे गांभीर्य ओळखून कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. तर माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news