Nashik Crime : खेडले येथे किरकोळ वादातून एकाचा खून, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

Nashik Crime : खेडले येथे किरकोळ वादातून एकाचा खून, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न
Published on
Updated on

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी तालुक्यातील खेडले येथे किरकोळ वादातून एकाचा खून करून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संदिप हरी मेधने वय (४१) यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणी संशयित किरण शरद कदम व अज्ञात व्यक्ती विरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल (दि. 11) रात्री ८ ते ११ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. किरकोळ वादातून ४१ वर्षीय इसमाचा तीक्ष्ण हत्याराने खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने ज्वलनशील पदार्थ मयताच्या शरीरावर टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

संदिप हरी मेधणे याच्यासोबत किरण शरद कदम रा. कोर्हाटे व त्याचा संशयीत मित्र अशा दोघांनी किरकोळ कारणावरुन वाद घातला. ते दोघे मेधने यांना घराबाहेर घेऊन गेले. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते ११ वाजेच्या सुमारास मेधणे यांच्या घराजवळील  चिंचेच्या झाडाखाली दोघांनी मेधणे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताच्या शरीरावर ज्वालाग्रही पदार्थ टाकुन जाळण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद मयताची आई रंभाबाई हरी मेधणे यांनी वणी पोलिसात दिली आहे.

अप्पर पोलिस अधिक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय अधिकारी संजय बामळे, सपोनी निलेश बोडखे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व फिर्यादीनुसार नमुद दोन संशयीत यांचे विरोधात खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच शवविच्छेदन करण्यासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news