बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने बुलडाणा येथे आयोजित राज्यस्तरिय साहित्य संमेलनाचे उदघाटन नागराज मंजूळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते म्हणाले, पुतळ्यांना आपण हात जोडतो आणि निघून जातो, मात्र लायब्ररी कायम ज्ञान देत राहते. त्यामुळे येणा-या पिढ्यांसाठी पुतळे आणि स्मारकांऐवजी लायब्ररी उभाराव्यात. शरिरासाठी जीमची तशी मेंदूसाठी लायब्ररीची आवश्यकता आहे. पुस्तकातूनच मेंदू सशक्त होतील. असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजूळे यांनी केले.
पुढे म्हणाले ते म्हणाले, अलिकडेच वाशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात आले आहे. मात्र तेथे बाबासाहेबांचा पुतळा कुठेच नाही. तर फक्त ऑडिओ आणि व्हिडीओ लायब्ररी आहे. तसेच वामनदादा कर्डक यांनी दहा हजारांवर लोकगीतातून बाबासाहेबांचे विचार गावागावात पोहचवले. आणि आंबेडकरी चळवळीला उर्जा पुरवली त्यांचे हे कार्य अमूल्य आणि अजरामर ठरले आहे. असे नागराज मंजूळे म्हणाले.
आद्य स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे साहित्यनगरीत आयोजित या संमेलनाला संमेलनाध्यक्ष अर्जून डांगळे,साहित्यिक सदानंद देशमुख, सिद्धार्थ खरात व स्वागताध्यक्ष रविकांत तुपकरसह साहित्य रसिकांची मोठी उपस्थित होते.
हेही वाचा