Nadav Lapid : ‘द कश्मीर फाइल्स’वर बोलणारे कोण आहेत नदाव लॅपिड?

Nadav Lapid
Nadav Lapid

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट यावर्षीचा भरघोस कमाई करणारा चित्रपट ठरला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने चर्चेत आला होता. यानंतर पुन्हा एकदा तब्‍बल आठ महिन्यांनी पुन्हा याची चर्चा रंगू लागली आहे. या वेळी इस्रायलचे चित्रपट निर्माते आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड ( Nadav Lapid ) यांनी 'द कश्मीर फाइल्स' ला असभ्य आणि दुष्प्रचार करणारा चित्रपट असल्याचे म्हटलं आहे. यामुळे विवेक अग्निहोत्री यांच्या 'द कश्मीर फाइल्स' चा निषेध करणारा नदाव लॅपिड कोण आहे हे जाणून घेवूया…

गोव्यात साजऱ्या होत असलेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरी म्हणून उपस्थित असलेले नदाव लॅपिड ( Nadav Lapid ) म्हणाले की, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपट पाहून आम्‍हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा  प्रसिद्धी स्टंट करणारा आणि असभ्य चित्रपट आहे. या प्रकारचे चित्रपट एखाद्या सुप्रसिद्ध चित्रपट महोत्सवाच्या कलात्मक, स्पर्धात्मक प्रकारात शोभत नाहीत. परंतु, या चित्रपटाबाबत विवेक अग्निहोत्री यांचा दावा आहे की, 'द कश्मीर फाईल्स…' चित्रपटामधून काश्मिरी पंडितांची दुर्दशा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपटाने भरघोस कमाई केली आहे. नदाव लॅपिड याच्या वक्त्याव्यानंतर बॉलिवूडसह सोशल मीडियावर त्याचा निषेध करत टीकेचा भडिमार सुरू झाला आहे.

कोण आहेत नदाव लॅपिड?

इस्रायलमधील तेल अविव येथे नदाव लॅपिड यांचा जन्म झाला आहे. त्यांनी तेल अवीव विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची पदवी संपादन केली आहे.लॅपिड यांनी फिल्मी जगतात पाऊल ठेवण्यापूर्वी इस्रायलच्या सैन्यात काम केले आहे. सैन्यातील सेवा बजावल्यानंतर त्यांनी जेरुसलेममधील सॅम स्पीगल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूलमधून पदवी प्राप्त केली. नंतर ते पॅरिसला गेले. त्यांनी अनेक चित्रपट बनवले आहेत. परंतु, नादव यांना खास करून लघुपट आणि माहितीपटांसाठी ओळखले जाते.

नदाव लॅपिड यांनी चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात सिनोनिम्स (२०१९), द किंडरगार्टन टीचर (२०१४ ) आणि पुलिसमॅन (२०११) सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. नदाव लॅपिड हे लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन लेपर्ड ज्युरीचे सदस्य, २०१६ कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील आंतरराष्ट्रीय समीक्षक वीक ज्युरीचे सदस्य आणि ७१ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऑफिशियल प्रतियोगिता ज्युरीचे सदस्यपद भुषविले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news