प्रभास- क्रिती लवकरच अडकणार लग्न बंधनात?; ‘आदिपुरुष’च्या सेटवर प्रपोज | पुढारी

प्रभास- क्रिती लवकरच अडकणार लग्न बंधनात?; 'आदिपुरुष'च्या सेटवर प्रपोज

पुढारी ऑनलाईन न्यूज : साऊथ सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दोघेजण स्टार्स एकमेकांना सध्या डेट करत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. परंतु, आतापर्यंत प्रभास आणि क्रिती दोघांनीही या वृताला दुजोरा दिलेला नाही. याच दरम्यान दोन्ही स्टार्सबद्दल आणखी एक नव्याने अपडेटस समोर येत आहेत. यात दोन्ही स्टार्स लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता प्रभासने क्रितीला याआधी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या सेटवर प्रपोज केलं आहे. यावेळी प्रभासने त्याच्या खास शैलीत गुडघ्यावर बसून क्रितीला प्रपोज केले होतं आणि क्रितीने यावेळी ‘हो’ म्हणत होकार दिसा होता. या नात्यामुळे दोन्ही कुटूंबियदेखील खूश असल्याचे दिसत आहे. याच दरम्यान आता प्रभास आणि क्रिती सध्या एकमेंकाना डेट करत असून लवकरच दोघेजण लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतची माहिती उमेर संधू यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास आणि क्रितीची दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. या चित्रपट रिलीज झाल्यानंतर हे कपल लग्न करणार असल्याचे माहिती समोर येत आहे.

याआधी छोट्या पडद्यावरील ‘झलक दिखला जा’ या शोच्या सेटवर वरुण धवनने स्वतः करण जोहरला सर्वांसमोर सांगितले की, क्रिती अशा व्यक्तीला डेट करत आहे जो सध्या मुंबईत नाही. आणि दीपिका पादुकोणसोबत शूटिंग करत आहे. यावरून वरुण अभिनेता प्रभासबद्दल बोलतोय हे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button