Suryakumar Sixer King : सूर्यकुमार यादव होणार ‘सिक्सर किंग’! इतिहास रचण्याची सुवर्ण संधी | पुढारी

Suryakumar Sixer King : सूर्यकुमार यादव होणार ‘सिक्सर किंग’! इतिहास रचण्याची सुवर्ण संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar Sixer King : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय संघासाठी हा निर्णायक सामना असेल. सध्या न्यूझीलंडचा संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतली. तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. आता मालिकेतील तिसरा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असून विजय मिळवण्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडू संघर्ष करताना दिसेल.

तिस-या एकदिवसीय सामन्यात भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) एक खास विश्विविक्रम करण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे. या सामन्यात जर सूर्याने पुन्हा आपल्या फलंदाजीने चमक दाखवली आणि आपल्या डावात 5 षटकार ठोकण्यात यश मिळवले तर तो रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक खास विक्रम मोडीत काढेल. खरं तर, एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. रोहितने 2019 मध्ये एकूण 78 षटकार मारले होत. (Suryakumar Sixer King Most sixes in a calendar year)

सूर्या तिसऱ्या सामन्यात 5 षटकार मारण्यात यशस्वी ठरला तर तो रोहितचा हा खास विक्रम तर मोडेलच शिवाय एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाजही बनेल. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत हिटमॅनने वर्चस्व गाजवले आहे. रोहितने 2019 मध्ये एकूण 78 षटकार मारले होते, तर 2018 मध्ये त्याने 74 षटकार मारले होते आणि 2017 मध्ये त्याने 65 षटकार मारले होते. याशिवाय 2015 मध्ये एबी डिव्हिलियर्सने एका वर्षात आपल्या बॅटने एकूण 63 षटकार ठोकण्यात यश मिळवले होते. (Suryakumar Sixer King Most sixes in a calendar year)

 

Back to top button