Munmun Dutta : बबीताने सोडला शो, बिग बॉस १५ मध्ये एंट्री

munmun dutta
munmun dutta
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

बिग बॉस १५ च्या घरात सुरभी चंदना, विशाल सिंह आणि आकांक्षा पूरी यांची एंट्री झालीय. विशेष म्हणजे, तारक मेहता का उल्टा चश्मा फेम बबीता मुनमुन दत्ताची (Munmun Dutta) देखील एंट्री झालीय. त्यामुळे Munmun Dutta ने तारक मेहता ही मालिका सोडली का? असा सवाल उपस्थित होत आहे.

कधी काही चुकीचं दिसलं तर मुनमुन खुल्यापणाने आपले विचार सोशल मीडियावर शेअर करते. आता चॅलेंजर्स म्हणून अन्य तीन कलाकारांप्रमाणे मुनमुनदेखील बिग बॉसच्या कहाणीमध्ये एक नवं ट्विस्ट घेऊन येईल.

बिग बॉसच्या घराजवळ एक 'फेक हाऊस' बनवण्यात आलंय. यामध्ये मुनमुन दत्ता, सुरभि चंदना, आकांक्षा पूरी आणि विशाल सिंह राहणार आहे. एक दिवसात ते घरातील सर्व स्पर्धकांना अनेक चॅलेंजेस देणार आहेत. या सर्वांचे म्हणणं आहे की, आतापर्यंत बिग बॉस-१५ चे स्पर्धक या शोला गांभीर्याने घेत नाहीत. हेच कारण आहे की, आतापर्यंत सर्व टास्क रद्द करण्यात आले आहेत. तिकिट टू फिनाले टास्क अधिक गांभीर्याने घेतलं जातं. पण, हा टास्कदेखील घरच्यांनी रद्द केला.

मुनमुनच्या एंट्रीने निशांतला आनंद

बबीता ही निशांत भट्टचे समर्थन करते. जेव्हा बिग बॉसद्वारा या चॅलेंजर्सच्या एंट्रीची घोषणा केली आहे.तेव्हा निशांतने मुनमुनला आवाज दिला. खरंतर, हे सर्व स्पर्धक वेगळ्या झोनमध्ये राहताहेत. आतापर्यंत घरच्यांसोबत तिचा आमना-सामना झालेला नाही. जेव्हा निशांतने मुनमुनला आवाज दिला, तेव्हा तिने देखील उत्तर दिलं. निशांतने म्हटलं की, 'मुनमुन मॅम, आठवतयं का, मी आपला डान्स कोरिओग्राफ केला होता ?"

निशांत भटट्ची फॅन आहे मुनमुन दत्ता

यावर मुनमुनने निशांतला म्हटलं की, 'हां निशांत, तू येथे कमालीचा खेळत आहेस.' आपलं कौतुक पाहून निशांतदेखील खुश झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news