मुलीनेच केला आईचा खून, लालबागमधील ‘त्‍या’ निर्घृण खूनाचे गूढ उलगडले

मुलीनेच केला आईचा खून, लालबागमधील ‘त्‍या’ निर्घृण खूनाचे गूढ उलगडले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मुंबईतील लालबाग परिसरातील पेरु कंपाउंडमध्ये एका निर्घृण खुनाची घटना समोर आली होती. या खूनाचे गूढ उकलण्‍यात काळाचौकी पोलिांना यश आले असून मुलीनेच आपल्‍या आईचा निर्घृण खून केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. रिंपल प्रकाश जैन असे अटक करण्‍यात आलेल्‍या महिलेचे नाव आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

खून करुन मृतदेह ठेवला होता कपाटात

लालबाग परिसरातील पेरु कंपाउंडमध्ये वीणा जैन यांचा मृतदेह घरातील कपाटात प्लॅस्टिक पिशवीत आढळून आला होता. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता आणि तो प्लॅस्टिक पिशवीत बांधून एका कपाटात ठेवला होता. या घटनेने लालबाग परिसरात खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे वीणा यांचे हात आणि पाय कापण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांना वीणा जैन यांच मुलगी रिंपल हिच्‍यावर संशय होता. या प्रकरणी काळाचौकी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता.

प्राथमिक तपासात पोलिसांना वीणा जैन यांच्‍या मुलीवर संशय होता. २२ वर्षीय रिंपल पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी तिची सखोल चौकशी केली असता तिनेच आईचा खून केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. रिंपल जैन हिला काळाचौक पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news