Parbhani : उभ्या ट्रकला मोटारसायकल धडकून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू | पुढारी

Parbhani : उभ्या ट्रकला मोटारसायकल धडकून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मानवत पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रकला मोटारसायकलची धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू. ही घटना मंगळवारी (ता. १४) रात्री सव्वानऊ च्या सुमारास स्वामी समर्थ जिनिंग समोरी घडली.  त्याचबरोबर आज सकाळीच महाराणा प्रताप चौकात (मानवत, जि. Parbhani) झालेल्या अपघातात २ शिक्षकांचा मृत्यू झाला होता . एकाच दिवशी रस्ता अपघातात ३ जण मृत्यू पावल्याने मानवतला मंगळवार हा अपघातवार ठरला आहे.

माहीतीनूसार, अपघातात मयत पोलिसाचे नाव सुधाकर रामकिशन कणके (वय ५२) असून ते परभणी मुख्यालयात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. ते सध्या पाथरी येथे राहत होते . मंगळवारी (ता १४) रात्री ते परभणीहुन पाथरीकडे मोटारसायकल वरून क्रमांक एम एच २२ ए क्यू २३८१ येत होते . शहराबाहेरील स्वामी समर्थ जिनिंग समोर रस्त्यावर उभा असलेल्या ट्रक क्रमांक ए पी १६ टी जे ६६२६ ते धडकले . या अपघातात ते गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. मयत सुधाकर  कणके यांचे  भाऊ सुरेश कणके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

हेही वाचा 

Back to top button