Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनची मुंबई रणजी संघात निवड!

Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनची मुंबई रणजी संघात निवड!
Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनची मुंबई रणजी संघात निवड!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रणजी ट्रॉफीच्या नव्या मोसमासाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला आहे. भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याचाही मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे. संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी पृथ्वी शॉ कडे देण्यात आली आहे. गेल्यावर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्येही पृथ्वी शॉने मुंबई संघाचे नेतृत्व केले होते. दरम्यान, भारताचा कसोटीपटू अजिंक्य रहाणे याचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

भारताचा कसोटी फलंदाज अजिंक्य रहाणे या रणजी मोसमात आपली फलंदाजी सुधारण्यासाठी मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रहाणेचा फॉर्म खराब आहे. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानाविषयी बरेच काही बोलले जात आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही रणजीमध्ये खेळल्यानंतर रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला काही धावा करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. आता रहाणे पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाकडून खेळणार आहे. (Arjun Tendulkar)

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने संघाची घोषणा केली. यामध्ये सर्वांच्या सहमतीने पृथ्वी शॉला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. रणजी करंडक स्पर्धेचे दोन टप्प्यात आयोजन करण्यात येणार आहे. पहिला टप्पा आयपीएलच्या आधी आणि दुसरा टप्पा आयपीएल संपल्यानंतर असेल. (Arjun Tendulkar)

मुंबईचा रणजी संघ पुढीलप्रमाणे आहे….

पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सरफराज खान, सचिन यादव, आदित्य तारे, हार्दिक तामोरे, शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन, प्रशांत सोळंकी, शशांक अत्तर्डे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बदियानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डियास, अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar).

मुंबई संघात अजिंक्य रहाणेची उपस्थिती ही एक आनंदाची बातमी म्हणता येईल. रहाणेच्या अनुभवाचा संघाला नक्कीच फायदा होणार आहे. रहाणेची फलंदाजीतील लय बिघडली आहे. अशा स्थितीत त्याला रणजी ट्रॉफीमधूनही फॉर्म परत मिळवण्याची संधी मिळणार आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. असे असले तेरी अर्जुनला प्रथम श्रेणी क्रिकेटच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळते की नाही हे पाहावे लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news