मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर टँकरची ४ दुचाकींना धडक; एकाचा मृत्‍यू

टँकरच्या धडकेत एकाचा मृत्‍यू
टँकरच्या धडकेत एकाचा मृत्‍यू

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा पूर्व द्रुतगती मार्गावरील चुनाभट्टी येथे एका रेडिमिक्स टँकरने चार दुचाकीसह एका मोटरगाडीला धडक दिली. ही घटना आज (रविवार) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये चार ते पाचजण जखमी झाले असून, त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चुनाभट्टी आय डी एम आय, गेट समोरील हायवेजवळील बीकेसी उड्डाणकडून कुर्लाकडे जाणाऱ्या मार्गावर एका मिक्सर गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोर जात असलेल्या चार दुचाकी आणि एका मारुती मोटरगाडीला धडक दिली.

त्यानंतर टँकर दुभाजकाला धडकून पलटी झाला. जखमींना नागरिकांनी सायन रुग्णालयात दाखल केले. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news