Delhi Rain : दिल्‍लीत मुसळधार; सरकारी अधिकाऱ्यांची रविवारची सुट्टी रद्द | पुढारी

Delhi Rain : दिल्‍लीत मुसळधार; सरकारी अधिकाऱ्यांची रविवारची सुट्टी रद्द

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन दिल्‍लीतल्‍या अनेक भागात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. यामुळे शहर तसेच उपनगरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. यामुळे अनेक रस्‍ते, पुल पाण्याखाली गेले आहेत. त्‍या पार्श्वभूमीवर दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व सरकारी अधिकार्‍यांची आज (रविवार) ची सुट्टी रद्द केली आहे. तसेच शहरात ज्‍या भागात पाणी आले आहे, त्‍या ठिकाणी जाउन लोकांच्या अडचणी जाणून घेण्याच्या तसेच या पूरस्‍थीतीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केजरीवाल यांनी मुसळधार पावसानंतर हे ट्‍वीट करून याची माहिती दिली.

दिल्‍लीत काल (शनिवार) १२६ मिमी पाऊस झाला. मान्सून काळातील एकुण पावसाच्या १५ टक्‍के पाऊस हा १२ तासात कोसळला. या पूरस्‍थितीमुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज सर्व मंत्री आणि महापौर पाणी भरलेल्‍या शहरातील भागांची पाहणी करतील. सर्व विभागातील अधिकाऱ्यांची रविवारची सुट्टी रद्द करण्यात आली असून, रस्‍त्‍यावर उतरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

१९८२ नंतर जुलै महिन्यात एका दिवसात झालेला हा सर्वात मोठा पाऊस

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार दिल्‍लीत आज (रविवार) सकाळी ८:३० वाजेपर्यंतच्या २४ तासांच्या काळात अभूतपूर्व असा १५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : 

Back to top button