दिल्‍लीत पावसाने तोडला वीस वर्षांचा विक्रम; १२६.१ मिमी पावसाची नोंद

दिल्‍लीत पावसाने तोडला वीस वर्षांचा विक्रम; १२६.१ मिमी पावसाची नोंद

नवी दिल्ली : पुढारी वृत्‍तसेवा दिल्लीत पावसाने आपला दोन दशकांचा विक्रम मोडला आहे. काल (शनिवार) राजधानीत 126.1 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. तर याआधी 2003 साली एका दिवसात 133.44 मिलिमीटर इतका पाऊस पडला होता.

एका दिवसात जास्त पाऊस पडल्याच्या वर्षांचा विचार केला, तर 2013 रोजी 123.4 मिलिमीटर व 2022 साली 117 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. सर्वात जास्त पाऊस पडल्याची नोंद 21 जुलै 1958 रोजी झाली होती. त्या दिवशी तब्बल 266.2 मिलिमीटर इतका पाऊस पडला होता. शनिवारी पडलेल्या पावसामुळे दिल्लीतले जनजीवन अस्तव्यस्त झाले होते. सखल भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, तर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. शिवाय सर्वत्र वाहनांच्या रांगा लागल्याने लोकांचे मोठे हाल झाले.

रविवारी सकाळी देखील राजधानीत हलका पाऊस पडला. किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस इतके होते. सरासरीपेक्षा तापमान तीन अंशाने कमी असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. शनिवारच्या पावसावेळी देशबंधू गुप्ता मार्गावर एका इमारतीचे छत कोसळून महिलेचा मृत्यू झाला.

हेही वाचा :   

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news