मुंबईतील हिरे उद्योग सुरतला जाताहेत, ही चुकीची माहिती : देवेंद्र फडणवीस

assembly session
assembly session

पुढारी ऑनलाई डेस्क : मुंबईतून हिऱ्याचा एकही उद्योग मुंबई बाहेर गेलेला नाही. मुंबईचं हिऱ्याचं मार्केट ८ महिने बंद ठेवलं होतं. गुजरातमधील सुरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हिऱ्यांचा उद्योग आहे. तिथे मॅन्युफॅक्च्युरिंग होतं. सुरत ही हिऱ्यांची बाजारपेठ आहे. आपल्याकडे निर्यात केलं जातं. त्यामुळे हिऱ्यांचा उद्योग कुठेही शिफ्ट झालेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फढणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले.

संबंधित बातम्या –

फडणवीस म्हणाले, येथील उद्योजाक, मजूर कामगारांनी साफ नकार दिला आहे की, आम्ही सुरतला जाणार नाही. मुंबईतील हिरे व्यापारी बाहेर गेलेले नाहीत. मुंबईतील उद्योग सुरतला जातील, हे मनातून काढून टाका. मुंबईशी स्पर्धा कोणीही करू नये. मुंबईतील ज्वेलरी पार्कला जीएसटीमध्येही सवलत दिल्याचे फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news