Aryan Khan Drug: आर्यन खानसह ८ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आर्यन खान
आर्यन खान
Published on
Updated on

आर्यन खान याच्यासह आठ आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीने न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत आठही आरोपींच्या कोठडीत 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

न्यायालयाने या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आता न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे.

आर्यनसह 8 आरोपी आज रात्री एनसीबी कार्यालयात न्यायालयीन कोठडीत असतील…

संध्याकाळचे ७ वाजून गेल्याने अशा परिस्थितीत तुरुंगाचे दरवाजे बंद असतात. त्यामुळे आर्यन खान आणि उर्वरित ७ आरोपी आजची (गुरुवार) रात्र तुरुंगात घालवणार नाहीत. आर्यन आणि उर्वरित आरोपींना एनसीबी कार्यालयाच्या लॉकअपमध्ये रहावे लागेल. अशा परिस्थितीत, एनसीबीचे लॉकअप न्यायालयीन कोठडी म्हणून घेतले गेले आहे. तथापि, या काळात, एनसीबी आर्यन किंवा उर्वरित ७ आरोपींची चौकशी करू शकणार नाही, कारण ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी विदेशी ड्रग्ज तस्कराला बेड्या

कॉर्डेलिया क्रूझमध्ये आयोजित ड्रग्ज पार्टीप्रकरणी दाखल गुन्ह्यात राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) एका विदेशी ड्रग्ज तस्कराला वांद्रे येथून अटक केली आहे. याप्रकरणातील ही 18 वी अटक आहे.

मुंबईहून गोव्याला निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीच्या पथकाने शनिवारी रात्री छापेमारी करुन बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना ड्रग्ज आणि रोख रकमेसह ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर एनसीबीकडून याप्रकरणाशी संबंधित संशयितांवर छापेमारी आणि अटकसत्र सुरु आहे. एनसीबीने बुधवारपर्यंत एकूण 17 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने बुधवारी रात्री वांद्रे येथे छापेमारी करुन एका परदेशी नागरिकाला ताब्यात घेत अटक केली आहे. एनसीबीने त्याच्याजवळून मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहे.

आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने बुधवारी रात्री अचीत कुमार याला अटक केली. ही याप्रकरणातील 17 वी अटक होती. तो या दोघांना गांजा पुरवत असल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे. एनसीबीने अचीत कुमार याच्या घरातून काही प्रमाणात गांजा जप्त केल्याचे समजते. अचीत कुमार याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला 09 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.

काय घडले त्या रात्री…

एनसीबीच्या पथकाने शनिवारी रात्री कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी करुन आर्यन खान याच्यासह त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा अशा आठ जणांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली.

एनसीबीने आरोपींजवळून 21 ग्रॅम चरस, 13 ग्रॅम कोकेन, 05 ग्रॅम एमडी, एमडीएमच्या 22 गोळ्या आणि 01 लाख 33 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून एनसीबीने रविवारी दुपारी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा याना अटक केली. तर, सायंकाळी उशीरा नुपूर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर आणि गोमित चोप्रा यांना अटक केली.

आयर्न खान ( Aryan Khan Drug ) याच्यासह अरबाज आणि मूनमून यांच्या कोठडीमध्ये न्यायालयाने 07 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. तर, अन्य पाच आरोपींनाही न्यायालयाने 07 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपत असल्याने एनसीबी या आठही आरोपींना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले. त्याआधी एनसीबीने आरोपींच्या सर्व वैद्यकीय तपासण्या पूर्ण केल्या आहेत. तर, आरोपींचे वकीलसुद्धा न्यायालयात हजर झाले आहेत.

सरकारी पक्ष आणि आरोपींचे वकील यांच्यात युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालय आपला निर्णय देणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news