mumbai attack 26/11 movie : 26/11 दहशतवादी हल्ल्याची भीषणता दाखवणारे चित्रपट आणि मालिका

mumbai attack 26/11 movie : 26/11 दहशतवादी हल्ल्याची भीषणता दाखवणारे चित्रपट आणि मालिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईवर भीषण हल्ला केला. १० दहशतवाद्यांनी सलग चार दिवस गोळीबार आणि बॉम्बस्फोटानॆ (26/11 Terror Attack26/11 Mumbai Attack)  मुंबई हादरली होती. दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस, ताज हॉटेल, कामा हॉस्पिटल, लिओपोल्ड कॅफे आदी ठिकाणी घुसखोरी करत हल्ले केले. या हल्ल्यात १६६ नागरिक मारले गेले तर ३०० हून अधिक जण जखमी झाले. पोलिसांनी चकमकीत ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. (mumbai attack 26/11 movie)

26/11 दहशतवादी हल्ल्याला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यानंतर अनेक संवेदनशील दिग्दर्शकांनी या घटनेवर आपआपल्या दृष्टीकोनातून चित्रपट आणि मालिकांची निर्मिती केली. या चित्रपट आणि मालिकांमधून 26/11 च्या घटनेचा प्रसंग सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न काही दिग्दर्शकांनी केला आहे. पाहुया असे कोणते चित्रपट आहेत, जे या हल्ल्यातील (26/11 Terror Attack) दहशतवादी मनोवृत्ती, शहिद भारतीय नागरिक, पोलिसांचा लढा आणि योगदानाची आपल्याला आठवण करून देतात. (mumbai attack 26/11 movie)

mumbai attack 26/11 movie : मेजर (२०२२)

'मेजर' हा चित्रपट २६/११ हल्ल्यातील शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारीत आहे. मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले संदीप उन्नीकृष्णन हे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) चे पहिले कमांडो होते. दिग्दर्शक शशीकिरण टिक्का दिग्दर्शित मेजर या चित्रपटात अभिनेता अदिव शेष यांनी संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका केली आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अदिवी शेषसोबत प्रकाश राज, सई मांजरेकर, रेवती आणि शोभिता मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती महेश बाबूच्या जीएमबी एंटरटेन्मेंट आणि सोनी पिक्चर्स यांनी केली आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. (mumbai attack 26/11 movie)

mumbai attack 26/11 movie : हॉटेल मुंबई (२०१८)

२६/११ हल्ला झाला यावेळी अनेक भारतीय आणि विदेशी पर्यटक ताज हॉटेलमध्ये होते. ताज हॉटेलमध्ये झालेला हल्ला आणि त्यावेळी ताजमध्ये असणाऱ्या परदेशी पाहूण्यांची अवस्था हे सर्व हॉटेल मुंबई या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. ताज हॉटेलच्या स्टाफने तसेच शेफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी लोकांची कशी मदत केली हे देखील या चित्रपटामध्ये दखवण्यात आले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, देव पटेल आणि आर्मी हेमर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

द अटॅक ऑफ 26/11

मुंबईवरील हल्ल्यानंतर जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब हा होता. त्याची पोलीस अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली, ही संपूर्ण घटना कशी घडली यावर 'द अटॅक ऑफ 26/11' हा चित्रपट आधारलेला आहे. 1 मार्च 2013 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.

मुंबई डायरीस् 26/11

निखिल अडवाणी आणि निखिल गोन्साल्विस यांनी 'मुंबई डायरीस् 26/11' या मालिकेची निर्मिती केली आहे. ही घटना अधोरेखित करणारी ही सर्वात वेदनादायी मालिकेपैकी एक आहे. या मालिकेत हल्ल्यानंतरची मुंबईतील सरकारी रुग्णालयातील भयंकर प्रसंग दाखवाला आहे. 26/11 च्या हल्ल्यानंतर जखमींना रूग्णालयात दाखल केल्यानंतर, येथील संकटांना वैद्यकीय समुदाय कसा हाताळतो हे यातून दाखवले आहे. तसेच या मालिकेत शहराने पाहिलेल्या सर्वात भयानक दहशतवादी हल्ल्याच्या रात्रीचे प्रदर्शन केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news