गँगस्टर मुख्तार अन्सारीची कारागृहात प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

उत्तर प्रदेशमधील गँगस्‍टर आणि माजी आमदार मुख्‍तार अन्‍सारी. (संग्रहित छायाचित्र )
उत्तर प्रदेशमधील गँगस्‍टर आणि माजी आमदार मुख्‍तार अन्‍सारी. (संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील गँगस्‍टर आणि माजी आमदार मुख्‍तार अन्‍सारी याची आज ( दि. २६ मार्च ) सकाळी कारागृहात प्रकृती बिघडली. त्‍याला बांदा येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.  रुग्‍णालयात कडेकोट पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. याप्रकरणी जिल्‍हा प्रशासनाने मौन बाळगले आहे.

मागील तीन दिवसांपासून अन्‍सारी याला पोटदुखीचा त्रास होत होता. आज पहाटे त्‍याला बांदा येथील राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्‍याची प्रकृती स्‍थिर असल्‍याचे रुग्‍णालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

मुख्तार अन्सारीच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा केल्यामुळे दोन दिवसांपूर्वी सरकारने एक जेलर आणि दोन डेप्युटी जेलरला निलंबित केले होते. माफिया मुख्तार अन्सारी याने आपल्या व्हर्च्युअल हजेरीत जेल प्रशासनावर कोर्टात त्याला स्लो पॉयझन दिल्याचा आरोप केला होता. मुख्तार अन्सारी यांची प्रकृती गेल्या आठवडाभरापासून सातत्याने खालावत होती आणि रात्रीच्या वेळी तो अधिकच गंभीर झाल्यानंतर त्‍याला रुग्‍णालयात दाखल करण्यात आले.

अन्सारीला 36 वर्षीय गाझीपूर बनावट शस्त्र परवाना प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अन्सारी आणि त्याच्या 12 सहकाऱ्यांविरुद्ध मार्च 2022 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news