‘आप’च्‍या घेराव आंदोलनास परवानगी नाकारली, पंतप्रधान निवासस्‍थान परिसरात कडेकोट सुरक्षा | पुढारी

'आप'च्‍या घेराव आंदोलनास परवानगी नाकारली, पंतप्रधान निवासस्‍थान परिसरात कडेकोट सुरक्षा

पुढारी ऑनलाईन : दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्‍याच्‍या निषेधार्थ आम आदमी पार्टी आज (दि.२६ मार्च) दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार हाेते. मात्र दिल्ली पोलिसांनी निदर्शनाला परवानगी नाकारली आहे. वाहतूक पोलिसांनी एक ॲडव्हायजरी जारी केली

दिल्लीचे पोलीस उपायुक्त देवेश कुमार महाला म्हणाले की, आंदोलनास परवानगी देण्यात आलेली नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पंतप्रधान निवासस्थान आणि पटेल चौक मेट्रो स्टेशनवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्‍यान, पटेल चौक मेट्रो स्थानकाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी एका कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी उशिरा अटक केली. यानंतर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरली. आम आदमी पार्टी (AAP) आणि इतर राजकीय पक्षांनी केजरीवाल यांच्या अटकेविरोधात राष्ट्रीय राजधानीसह देशभरात निदर्शने सुरू केली आहेत.

31 मार्चला रामलीला मैदानावर रॅली

31 मार्च रोजी रामलीला मैदानावर इंडिया आघाडी केंद्र सरकारविरोधात रॅली काढणार आहे. आम्ही मिळून देशांतर्गत संयुक्त लढा वाढवू. दिल्ली काँग्रेस आणि आपच्या संयुक्त पत्रकार परिषदेत या गोष्टी सांगण्यात आल्या. विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. देशातील लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button