Monsoon in India | ‘ला निना’ परतणार! यंदा मान्सून धो- धो! वाचा जगभरातील हवामान संस्थांचा अंदाज काय सांगतो?

Monsoon - File Photo
Monsoon - File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या वर्षी पॅसिफिक महासागरात 'एल निनो'ची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे त्याचा मॉन्सूनवर परिणाम झाला होता. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले होते. तसेच हिंवाळ्यातही उबदार वातावरण राहिले. पण आता जगभरातील अनेक हवामान संस्थांनी येत्या मान्सून कालावधीत 'ला निना' परत येण्याचा अंदाज वर्तवला आहे. आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (APCC) क्लायमेट सेंटरने या वर्षातील भारतातील पहिल्या मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. केंद्राने एप्रिल ते जून आणि जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी दोन स्वतंत्र हवामान अंदाज जारी केले आहेत. (Monsoon in India)

या अंदाजानुसार, देशातील मान्सून हंगामातील जुलै ते सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. या अंदाज बदलाचे श्रेय अलीकडील ENSO अलर्टला दिले जाते; जे एल निनो ते ला निना स्थितीत अंदाज व्यक्त करते.

एपीसीसीच्या अंदाजांचा हवाला देत, इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की जुलै ते सप्टेंबर या कालावधीत देशात सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. जुलै ते सप्टेंबरच्या अंदाजात, एपीसीसी क्लायमेट सेंटरने म्हटले आहे की, "पूर्व आफ्रिका ते अरबी समुद्र, भारत, बंगालचा उपसागर आणि इंडोनेशिया, कॅरिबियन समुद्र, उष्णकटिबंधीय उत्तर अटलांटिक, दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण दक्षिण पॅसिफिक प्रदेशापर्यंत सामान्यपेक्षा अधिक पावसाची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियाच्या काही प्रदेशांमध्ये सामान्यपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी अपेक्षित आहे."

एपीसीसी क्लायमेट सेंटरने १५ मार्च २०२४ रोजी एक ENSO (El Nino-Southern Oscillation) अलर्ट सिस्टम अपडेट दिले. सध्याची ENSO स्थिती एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी ला निना परिस्थितीचा अंदाज व्यक्त करते. हा अलर्ट बदललेला हवामान पॅटर्न आणि परिणामी पर्यावरणीय परिणामांसारख्या ला निना परिस्थितीशी संबंधित संभाव्य परिणामांमुळे येत्या काही महिन्यांत हवामानाच्या नमुन्यांची बारकाईने निरीक्षण करण्याची स्टेकहोल्डर्स आणि धोरणकर्त्यांची महत्त्वाची गरज अधोरेखित करते.

अलीकडील मल्टी-मॉडेल एन्सेम्बल (MME) हवामानाचा अंदाज एप्रिल ते जून २०२४ साठी विविध प्रदेशात सामान्यपेक्षा अधिक, जवळपास सामान्य आणि सामान्यपेक्षा कमी तापमानाचा अंदाज लावण्यासाठी भिन्न अचूकता पातळी दर्शवितो. युरोपने लक्षणीय हेडके स्किल स्कोअर (HSS) ६६.९ टक्के एवढा पोस्ट केला आहे. हा एक विश्वासार्ह अंदाज दर्शविते. तर दक्षिण आशिया ८२ टक्के एवढा हेडके स्किल स्कोअर दर्शविते. मध्य पूर्वदेखील ७०.५ टक्क्यांचा लक्षणीय अंदाज अचूकता दर्शविते. (Monsoon in India)

जुलै-सप्टेंबर अंदाज

अनेक जागतिक हवामान संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ला निना परिस्थिती जूनमध्ये पहिल्यांदा दिसू शकते. पण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ती ठळकपणे दिसून येईल.

एल निनो निघून गेला

"एल निनो निघून गेला आहे आणि थंड टप्पा येत आहे. त्यामुळे चांगल्या मान्सून पावसाची शक्यता अधिक आहे. मे महिन्यापर्यंत याबाबत चित्र समोर येईल," असे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम. राजीवन यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त डेक्कन हेराल्डने दिले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news