याला म्हणतात जबरा फॅन! लग्नपत्रिकेवर छापला महेंद्रसिंग धोनीचा फोटो

याला म्हणतात जबरा फॅन! लग्नपत्रिकेवर छापला महेंद्रसिंग धोनीचा फोटो
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा चाहता वर्ग किती आहे हे नुकतेच झालेल्‍या आयपीएल स्‍पर्धेत क्रिकेटप्रेमींने अनुभवलं आहे. देशात आजवर अनेक दिग्‍गज क्रिकेटपटूंचा एक चाहता वर्ग होता. मात्र महेंद्रसिंग धोनी या नावाला त्‍याच्‍या फॅनमुळे एक वेगळे वलय प्राप्‍त झाले आहे. ( MS Dhoni fan ) अलीकडेच त्याच्या एका दमदार चाहत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि असे काही केले ज्याची सध्या सोशल मीडियावरही चर्चा होत आहे.

छत्तीसगडच्या रायगढ जिल्ह्यातील धोनीच्‍या एका चाहत्‍याने त्याच्या लग्नपत्रिकेवर स्‍वत:च्‍या फोटो ऐवजी महेंद्रसिंह धोनीचा फोटो लावला. धोनीच्या या चाहत्याचे नाव दीपक पटेल असे आहे. तो मिलुपारा येथील कोंडकेल जिल्ह्यातील रहिवासी आहे. या लग्नपत्रिकेमध्ये धोनीच्या फोटोसह जर्सी क्रमांक आणि त्याचे नाव छापण्यात आले आहे. धोनीचा फोटो असलेली ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ( MS Dhoni fan )

दीपक पटेल याने धोनीला आपल्‍या लग्‍नाचे आमंत्रण देणारे कार्डही पाठवले आहे. दीपक लहानपणापासून महेंद्रसिंग धोनीचा मोठा फॅन आहे. तो त्‍याला आपला आदर्श मानतो.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news