भोपाळ; पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशमधील भोपाळ येथील महिला सहाय्यक महिला अभियंत्याच्या फार्म हाऊसवर लोकायुक्तांनी छापा टाकला आहे. या छाप्यात महिला अभियंता हेमा मीना यांच्याकडे तब्बल सात कोटींची मालमत्ता सापडली आहे. दरम्यान हेमा मीना यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. याबाबत हेमा यांनी ही मालमत्ता त्यांच्या वडिलांनी आणि भावानी विकत घेतली असून त्यांनी मला ती दान केली असल्याचे म्हटले आहे. सध्या लोकायुक्त पथक या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करत आहे. गरज पडल्यास हेमाने माहिती दिलेल्या विभागातील इतर अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाऊ शकते. (MP Corruption)
लोकायुक्तांनी गुरुवारी टाकलेल्या छाप्यात मध्य प्रदेश पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या कंत्राटी सहायक अभियंता हेमा मीना यांची कोट्यवधींची मालमत्ता उघडकीस आली. लोकायुक्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमा मीना या सहाय्यक अभियंत्याचा मासिक पगार ३० हजार रुपये आहे, परंतु हेमा यांनी १३ वर्षांच्या सेवेत तिच्या उत्पन्नापेक्षा ३३२ टक्के अधिक संपत्ती कमावली. (MP Corruption)
पगारानुसार हेमा यांची संपत्ती कमाल १८ लाख रुपये असायला हवी होती. आतापर्यंत हेमा यांच्याकडे ७ कोटींची संपत्ती आहे. आता बँक आणि इतर कागदपत्रे तपासावी लागणार आहेत.
हेमा मीना या त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या जमिनीवर बांधलेल्या ४० खोल्यांच्या बंगल्यात राहतात. त्याची किंमत एक कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय फार्म हाऊसवर लाखो रुपयांचे ३० हून अधिक विदेशी जातीचे कुत्रेही सापडले आहेत. तसेच विविध जातींच्या ६० ते ७० गायी आढळून आल्या आहेत.
अधिक वाचा :