जगातील ६० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक लोकसंख्‍या सोशल मीडियावर : नवीन सर्वेक्षणातील माहिती

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सोशल मीडिया या शब्‍दांनी अवघ्‍या काही वर्षांमध्‍ये संपूर्ण जगावर गारुड केले आहे. संवादाच्‍या या नव्‍या प्लॅटफॉर्मचा वापरामध्‍ये लक्षणीय वाढ होत आहे. आता जगातील तब्‍बल ६० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक लोकसंख्‍या सोशल मीडियाचा वापर करत असल्‍याची माहिती डिजिटल सल्‍लागार कंपनी 'केपिओस'च्‍या नवीन सर्वेक्षणात समाेर आली आहे.मागील वर्षभरात सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्‍ये ३.७ टक्‍के इतकी वाढ झाली असून, या सर्वेक्षणात जगभरात लोक दररोज किती तास सोशल मीडियाला देतात, यावरही प्रकाशझोत टाक‍ण्यात आला आहे. (Social Media user)

Social Media user : भारतात ३ पैकी एकाकडून सोशल मीडियाचा वापर

'केपिओस'च्‍या सर्वेक्षण अहवालात म्‍हटलं आहे की, जगभरात आता सोशल मीडिया वापरकर्त्यांची संख्‍या ५.१९ अब्‍ज झाली आहे. आता जगातील एकुण लोकसंख्‍येच्‍या ६४.५ टक्‍के लोक सोशल मीडियाचा वापर करतात. मात्र देशनिहाय या
वापरकर्त्यांमध्ये प्रचंड विषमता दिसून येते. पूर्व आणि मध्‍य आफ्रिकेतील ११ पैकी फक्‍त एक व्‍यक्‍ती सोशल मीडियाचा वापर करते तर भारतात ही संख्‍या तीनपैकी एक अशी आहे.

Social Media user : सोशल मीडिया वापराची वेळ वाढली

दिवसभरात लोक किती तास सोशल मीडियाचा वापर करत याचेही सर्वेक्षण झाले. यामध्‍ये वाढ झाल्‍याचे दिसून आले. आता सोशल मीडियावर घालवलेल्या वेळेचे प्रमाणही दिवसाला दोन मिनिटांनी वाढले आहे. वापरकर्ता दररोज २ तास २६ मिनिटे असतो. मात्र देशनिहाय यामध्‍येही फरक आढळतो. ब्राझील या देशात दररोज सरासरी ३ तास ४९ मिनिटे लोक सोशल मीडियाचा वापर करतात. तर जपानमध्‍ये हे प्रमाण केवळ एक तासापेक्षा कमी असल्‍याचे आढळले.

कोणत्‍या ॲप्‍सचा वापर सर्वाधिक?

संपूर्ण जगभरात सोशल मीडिया वापरकर्ता हा सर्वाधिक सात प्लॅटफॉर्मचा वापर करतो. मात्र यामध्‍ये 'मेटा'चे व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसह तीन सर्वाधिक वापरले जाणारे ॲप्‍स असल्‍याचेही या सर्वेक्षणात नमूद करण्‍यात आले आहे. चीनमध्‍ये WeChat, TikTok आणि त्याची स्थानिक आवृत्ती Douyin. ट्विटर, मेसेंजर आणि टेलिग्राम हे टॉप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असल्‍याचेही अहवालात म्‍हटलं आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news