Popular Social Media Network : ‘टॉप 10’ लोकप्रिय सोशल मीडिया साइटच्या यादीतून Twitter बाहेर; कोण आहे नंबर वन ? | पुढारी

Popular Social Media Network : 'टॉप 10' लोकप्रिय सोशल मीडिया साइटच्या यादीतून Twitter बाहेर; कोण आहे नंबर वन ?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Popular Social Media Network : आपले आभासी जग सोशल मीडिया साइट्सने व्यापले आहे. हे जग आपल्या प्रत्यक्ष जगण्याचा एक अविभाज्य भाग बनले आहे. आज प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या समाज माध्यमांवर अॅक्टिव्ह असतो. आभासी जगात अनेक सोशल मीडिया (Social Media) साइट्स आहे. ज्यामध्ये सातत्याने मोठी स्पर्धा असते. प्रत्येक साइट्स आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे बदल करत असतात. मात्र, सातत्याने बदल करणे देखील दर्जा घसरण्याचे कारण असू शकते. Twitter ला देखील याचाच फटका बसत आहे. लोकप्रिय सोशल मीडिया साइट्सच्या यादीतून ट्विटर टॉप 10 च्या बाहेर फेकले गेले आहे. चला जाणून घेऊया कोण आहे नंबर वन आणि ट्विटर कितव्या स्थानावर आहे.

Popular Social Media Network : लोकप्रिय सोशल मीडिया साइट्समध्ये कोण आहे नंबर वन

एका जर्मन ऑनलाइन डेटा गोळा करणे आणि व्हिज्युअलायझेशन प्लॅटफॉर्म स्टॅटिस्टा द्वारे जानेवारी 2023 पर्यंत मासिक सक्रिय वापरकर्त्यांच्या संख्येवर आधारित जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवर्क्सची यादी जाहीर केली आहे. यामध्ये फेसबुक ही नंबर वन लोकप्रिय सोशल मीडिया साइट्स आहे. तर यु ट्यूब हे दुसऱ्या क्रमांकावरील चॅनल आहे.

मेटाची बाजी (Meta-Fb, Insta, What’s app)

स्टॅटिस्टा द्वारे जानेवारी 2023 पर्यंत जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवर्क्स, मासिक सक्रिय वापरकर्त्यांच्या संख्येवर आधारित मेटा चे तीनही प्लॅटफॉर्म टॉप-4 मध्ये आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा यूट्यूब सोडला तर इतर सर्व प्रमुख सोशल मीडिया साइट्स मेटाने व्यापल्या आहेत. यादीनुसार, जगभरात व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामचे 200 दशलक्षहून अधिक मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत.

ट्विटर (Twitter) 14 व्या स्थानावर

स्टॅटिस्टा द्वारे जानेवारी 2023 पर्यंत मासिक सक्रिय वापरकर्त्यांच्या संख्येवर आधारित जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवर्क्सची यादीत ट्विटर हे 14 व्या स्थानावर फेकले गेले आहे. पहिल्या टॉप 10 मध्येही ट्विटरला स्थान नाही. तर ट्विटरला मासिक अॅक्टिव्ह यूजर्सचा फर्स्ट क्लासचा टप्पा देखील गाठता आलेला नाही. ट्विटरचे अॅक्टिव्ह मासिक युजर्स 60 कोटींपेक्षा देखील कमी आहेत.
टेस्लाचे एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर ट्विटरमध्ये सातत्याने बदल करण्यात येत आहेत. तसेच काही नवीन सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. ट्विटरचे ब्ल्यू बॅज सर्वांसाठी पेड केले आहे. तसेच ट्विटरला दररोज किती ट्विट पाहू शकतात यावरही मर्यादा घालण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ट्विटर सातत्याने डाऊनच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे देखील ट्विटरला मोठ्या संख्येने फटका बसला आहे.

Popular Social Media Network : कोणत्या सोशल मीडिया साइटचे मासिक सक्रिय वापरकर्ते किती आहेत?

फेसबुक – Facebook – 295.8 कोटी
YouTube – 251.4 कोटी
व्हॉट्सअॅप what’s app- 200 कोटी
इंस्टाग्राम Instagram  – 200 कोटी
WeChat – 130.9 कोटी
टिकटॉक  tiktok- 105.1 कोटी
फेसबुक मेसेंजर Facebook messenger – 93.1 कोटी
Douyin – 71.5 कोटी
टेलिग्राम Telegram – 70 कोटी
स्नॅपचॅट Snapchat – 63.5 कोटी
कुएशौ – 62.6 कोटी
सिना वेबो – 58.4 कोटी
QQ – 57.4 कोटी
ट्विटर – Twitter – 55.6 कोटी
Pinterest – 44.5 कोटी

Twitter Down : ट्विटर पुन्हा डाऊन; सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

Elon Musk : ट्विटर ‘पोस्ट’बाबत मस्क यांची माेठी घाेषणा, आता दिवसभरात…

Back to top button