नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : बारा ते चौदा वयोगटातील (age group 12-14 years) मुलांच्या लसीकरणास (first dose of COVID-19 vaccine) बुधवारपासून सुरुवात झाली होती. त्यानुसार पहिल्याच दिवशी 3 लाख 405 मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी देण्यात आली. दरम्यान गेल्या चोवीस तासांत कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत 2539 ने वाढ झाली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या आता 4 कोटी 30 लाख 1 हजार 477 वर पोहोचली आहे. चोवीस तासांत कोरोनाने 60 लोकांचा बळी घेतला. यानंतर मृतांचा एकूण आकडा 5 लाख 16 हजार 132 वर गेला आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 30 हजार 799 पर्यंत खाली आली आहे. चोवीस तासांत 4 हजार 491 रुग्ण बरे झाले आहेत. यानंतर रिकव्हरी दर 98.73 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 180.80 डोसेस देण्यात आले आहेत. संक्रमणाचा दैनिक दर (Positivity Rate) 0.35 टक्के तर साप्ताहिक दर 0.42 टक्के इतका नोंदविला गेला असल्याची आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
12 ते 14 वयोगटातील मुलांना 'कॉर्बेव्हॅक्स' लस देण्यास (COVID-19 Vaccination) बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी 3 लाख 405 लाख मुलांना लस देण्यात आली आहे. हैदराबाद स्थित बायोलॉजिकल ई कंपनीकडून कॉर्बेव्हॅक्स लस विकसित करण्यात आली आहे. 28 दिवसांच्या कालावधीत दोनदा ही लस दिली जाणार आहे. 1 मार्च 2021 रोजीच्या आकडेवारीनुसार 12 ते 14 वयोगटातील मुलांची संख्या 4.7 कोटी इतकी आहे. साठ वर्षांवरील लोकांना दिल्या जात असलेल्या बूस्टर डोसचा विचार केला तर आतापर्यंत 2.15 कोटी डोसेस देण्यात आले असल्याचेही आरोग्य खात्याकडून नमूद करण्यात आले आहे.