Monsoon Update : मान्सूनने महाराष्ट्र सोडला; यंदा दोन आठवडे आधीच परतला

Monsoon Update : मान्सूनने महाराष्ट्र सोडला; यंदा दोन आठवडे आधीच परतला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मान्सूनने सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रस्थान केल्याची घोषणा हवामान विभागाने केली. यंदा तो दरवर्षी पेक्षा दोन आठवडे आधीच राज्यातून दक्षिण भारताकडे गेला आहे. यंदा राज्यातून 5 ऑक्टोबर रोजी मान्सून उत्तर महाराष्ट्रातून परतीच्या प्रवासाला प्रारंभ केला. जसा तो येताना रेंगाळतो तसा जातानाही रेंगाळतो. त्यामुळे राज्यातून जाताना 20 ते 25 ऑक्टोबर ही तारीख उजाडते.

मात्र, यंदा त्याच्या परतीचा प्रवास वेगाने झाला. शिवाय जाताना तो बरसला नाही. 5 ऑक्टोबर रोजी सुरुवात होऊन 9 ऑक्टोबरला मान्सून राज्याबाहेर पडला. यंदा मान्सून राज्यातून 10 ते 12 ऑक्टोबर रोजी जाईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. मात्र, तो त्याहीपेक्षा दोन ते तीन दिवस आधीच राज्यातून गेला आहे.

मान्सूच्या परतीचा प्रवास 25 सप्टेंबरपासून राजस्थानातून सुरू झाला होता. सोमवारी तो देशाच्या 80 टक्के भागातून गेला आहे. आता तो तामिळनाडू,आंध्र प्रदेश, छत्तीसगडचा काही भाग आसाम व पं.बंगालच्या काही भागांत आहे. तेथून तो वेगाने पुढे जाईल, असा अंदाज आहे.

कमाल तापमानात होणार वाढ

मान्सून राज्यातून पूर्ण परतल्याने आता वातावरण कोरडे आहे. कुठेही पावसाचा अंदाज नाही. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानात गेल्या 24 ते 48 तासांत 8 ते 10 अंशांनी वाढ झाली आहे. विदर्भातील ब्रम्हपुरी येतील कमाल तापमानाचा पारा 37 अंशावर गेला आहे. तर उर्वरित राज्यांचा पारा 32 ते 36 अंशावर आहे. या तापमानात आणखी वाढ होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news