मान्सूनने ९५ टक्के देश व्यापला, राज्यात ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मान्सूनने ९५ टक्के देश व्यापला, राज्यात ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मंगळवारी दुपारच्या सुमारास मान्सूनने गुजरात राज्य पार करीत राजस्थानसह पंजाबचा काही भाग व्यापलं असून आता फक्त चार ते पाच टक्के राजस्थानचा भाग बाकी आहे. येत्या ४८ तासांत तो १०० टक्के देश व्यापेल, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. के. एस. होसाळीकर वर्तवला आहे.

मान्सूनने मंगळवारी जोरदार प्रगती केली आहे. मध्य व उत्तर अरबी समुद्रासह संपूर्ण गुजरात राज्य पार केले. तसेच तो आज राजस्थान व पंजाबच्या काही भागात पोहचला. दरवर्षी या भागात तो ५ ते ८ जुलै दरम्यान पोहचतो. मात्र, वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे तो २७ जून रोजीच त्या भागात पोहचला आहे. पुढील ४८ तासांत तो संपूर्ण देश व्यापणार आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढत असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि नागपूरला आगामी तीन दिवस येलो अलर्ट दिला आहे. यात प्रामुख्याने ठाणे, नाशिक पुणे साताऱ्याचा घाट परिसर या भागात आज रात्री अतिवृष्टी होईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच पालघर, जळगाव, मुंबई या ठिकाणी आज सांयकाळी ७ ते १० या वेळेत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

अरबी समुद्र ते गुजरात व केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवेच्या वरच्या थरात वाऱ्याचा वेग प्रचंड वाढल्याने केरळ, महाराष्ट्र व गुजरात राज्यात बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोर पुढील पाच दिवस वाढणार आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news