money laundering case : अनिल देशमुख यांची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी

अनिल देशमुख
अनिल देशमुख

मनी लाँड्रिंग प्रकरणात (money laundering case) अडकलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आजही कोणताच दिलासा मिळाला नाही. त्यांची १२ नोव्हेंबरला तीन दिवस कोठडी वाढल्यानंतर आजच्या सुनावणीमध्येही त्यांना कोणताच दिलासा मिळाला नाही.

न्यायालयाकडून त्यांची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसूलीचा आरोप केल्यानंतर अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर (money laundering case) केलेल्या 100 कोटी वसूली, भ्रष्टाचार आणि गैरकारभाराच्या गंभीर आरोपांवरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्राथमिक तपास करुन गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. तर, याच गुन्ह्याच्या आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करुन ईडी तपास करत आहे. ईडीने 01 नोव्हेंबरच्या रात्री देशमुखांना अटक केली होती.

विशेष सत्र न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर शनिवारी देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर उच्च न्यायालयाच्या विशेष सुट्टीकालीन खंडपीठासमोर रविवारी सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा न्यायालयीन कोठडीचा निर्णय रद्द करत देशमुख यांना 12 नोव्हेंबपर्यंत ईडी कोठडी सुनावली. त्यानुसार ईडीने सोमवारी देशमुख यांचा ताबा घेतला आहे. त्यांनंतर त्यांची कोठडी पुन्हा तीन दिवस वाढवण्यात आली होती.

ईडी आता देशमुख यांच्याकडे चौकशी करत आहे. ईडीला देशमुख पिता-पुत्राची एकत्रित चौकशी करायची आहे. त्यामुळे देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश यालाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याचे बोलले जाते. मात्र, अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी ऋषिकेश देशमुख यांना समन्स आले नसल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news