Mocha Cyclone Update : ‘मोचा’ चक्रीवादळाने म्यानमारमध्ये घेतला तिघांचा बळी, प्रचंड नुकसान

Mocha Cyclone Update
Mocha Cyclone Update

पुढारी ऑनलाईन : चक्रीवादळ 'मोचा' रविवारी (दि.१४) म्यानमारच्या किनारपट्टीवरीलसिटवे टाउनशिपजवळ धडकले. या चक्रीवदाळने काही इमारतींचे छत उडाले आणि ३ जणांचा बळी घेतला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्‍ये (Mocha Cyclone Update) म्यानमारचे प्रचंड नुकसान झाले आहे. बंदर शहर सित्तवे पूरात बुडाल्याचे, वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.

म्यानमारच्या सित्तवे (Mocha Cyclone Update) या भागात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वीज आणि वाय-फाय कनेक्शन विस्कळीत झाले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये यांगूनमध्ये मुसळधार पावसात घरांची छत उडाले आणि होर्डिंग्ज इमारतींवर कोसळलेली दिसत आहेत.

Mocha Cyclone Update :३ लाख रोहिंग्या निर्वासित सुरक्षित

मोचा चक्रीवादळ बांगलादेशात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे घेऊन आल्याने, जगातील सर्वात मोठी निर्वासित छावणी असलेल्या कॉक्स बाजारला देखील मोठा फटका बसला. या छावणातील 1,300 हून अधिक बांबूची घरे नष्ट झाली आहेत, असे 'बीबीसी'ने वृत्त दिले आहे. चक्रीवादळाच्या लँडफॉलच्याआधी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, प्रशासनाने कॉक्स बाजारमधील सुमारे 3,00,000 रोहिंग्या निर्वासितांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी (Mocha Cyclone Update) झाली नाही.

'मोचा'आज चीनमध्‍ये धडकणार

म्यानमारमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, येथील लष्करी प्रशासनाकडून वादळाचा फटका बसलेल्या भागात अन्न, औषध, वैद्यकीय मदत आणि कर्मचारी पाठवण्याच्या तयारीत आहे. राखीनला धडक दिल्यानंतर, चक्रीवादळ कमकुवत झाले आहे. आज सोमवारी (दि.१५) चीनमधील उत्तर-पश्चिम आणि मध्य राज्यांना धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, असे वृत्त 'एपी'ने दिले आहे.

ईशान्यकडील राज्यांना ऑरेंज अलर्ट

चक्रीवादळ मोचाच्या पार्श्वभूमीवर, IMD ने सोमवारी आसाम, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर आणि नागालँडसह ईशान्य भारतातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ईशान्येकडील राज्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मोचा चक्रीवादळ मिझोराम, मणिपूर, पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि उत्तर पूर्व बंगालच्या उपसागरात सुमारे ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने पुढे सरकत आहे. यामुळे ६० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news