काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी आमदार सतेज पाटील इच्छुक; अशोक चव्हाण यांचे नाव आघाडीवर

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी आमदार सतेज पाटील इच्छुक; अशोक चव्हाण यांचे नाव आघाडीवर
Published on
Updated on

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याची माहिती पुढे आली असून आ. बाळासाहेब पाटील आणि आ. सतेज पाटील हेही या पदासाठी इच्छुक आहेत.

दरम्यान, चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी राजधानीत येऊन पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेटही यासंदर्भात घेतली होती. मुंबई विभागीय काँग्रेस अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा येणार हे जवळपास निश्चित झाले होते. तथापि, अंतिम क्षणी यावर कोणताही निर्णय झाला नाही, असे सूत्रांकडून समजले. पक्षाने मराठा समाजाच्या मतांऐवजी ओबीसींच्या मतपेढीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असाही एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये दिसून येतो. तथापि, काँग्रेसला सध्याच्या परिस्थितीत मतांच्या गणितापेक्षा पक्ष संघटना भक्कम करायची आहे. हे काम चव्हाण प्रभावीरीत्या करू शकतात, असे मानले जाते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news