कोल्हापूर : सैनिक टाकळीत आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : सैनिक टाकळीत आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा :  आईच्या मृत्युपाठोपाठ दुसर्‍याच दिवशी मुलाचाही मृत्यू झाल्याची घटना सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे घडली. येथील गोपाळ खंडू पाटील असे मृताचे नाव आहे. बाबाई खंडू पाटील या कृष्णा नदीत पूजन करण्यासाठी गेल्या होत्या. तत्पूर्वी, आंघोळ करताना त्या नदीत बुडाल्या, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

मंगळवारी ही घटना घडली होती. बुधवारी त्यांचा मुलगा गोपाळ पाटील यांचे निधन झाले. डेंग्यूसद़ृश्य आजारावर त्यांच्यावर सांगली येथे उपचार सुरू होते. त्यातच त्यांना आईच्या मृत्यूची बातमी समजली. दवाखान्यात उपचार सुरू असतानाच त्यांना धक्का बसला. बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूने कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गोपाळ यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. पंचायत समिती माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील यांचे बंधू होत.

Back to top button