MLA Rohit Pawar : नोटीसीनंतर रोहित पवारांची पोस्ट चर्चेत; “रिटर्न गिफ्ट…”

MLA Rohit Pawar : नोटीसीनंतर रोहित पवारांची पोस्ट चर्चेत; “रिटर्न गिफ्ट…”

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य प्रदूषण नियामक मंडळाने केलेल्या  कारवाई नंतर रोहित पवारांनी आपल्या 'X' खात्यावर "राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली." अशा आशयाची पोस्ट करत  खुलासा केला आहे. वाचा ती पोस्ट त्यांच्या शब्दात. (MLA Rohit Pawar)

MLA Rohit Pawar : काय आहे प्रकरण

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांना  राज्य प्रदूषण नियामक मंडळाचा दणका. बारामतीमधील बारामती ॲग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. राज्य प्रदूषण नियामक मंडळाने ७२ तासात  प्लांट बंद करण्याची सूचना दिली आहे.

रोहित पवारांचा खुलासा, सरकारला नक्कीच 'रिटर्न गिफ्ट'

रोहित पवारांनी आपल्या 'X' खात्यावर  केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे की,

"राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.

"युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे. हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही. आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही.

माझ्या वाढदिवसानिमित्त 'गिफ्ट' दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच 'रिटर्न गिफ्ट' देईल, ही खात्री आहे. असो! पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील."

ते दोन बडे नेते कोण?

रोहित पवार यांनी कारवाई नंतर केलेली पोस्ट राजकीय वर्तूळासह सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. आता दोन बडे नेते कोण अशी चर्चा रंगु लागल्या आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news