

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रोहीत पवार यांना राज्य प्रदूषण नियामक मंडळाचा दणका. बारामतीमधील बारामती ॲग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. राज्य प्रदूषण नियामक मंडळाने ७२ तासात प्लांट बंद करण्याची सूचना दिली आहे.
राज्य प्रदूषण नियामक मंडळाने केलेल्या कारवाई नंतर रोहीत पवारांनी आपल्या 'X' खात्यावर "राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली." अशा आशयाची पोस्ट करत खुलासा केला आहे.
हेही वाचा