वैभव नाईकांबाबतचे पुरावे आमच्याकडे; कोटींची मालमत्ता वाढली कशी? : आ. नितेश राणे

वैभव नाईकांबाबतचे पुरावे आमच्याकडे; कोटींची मालमत्ता वाढली कशी? : आ. नितेश राणे

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाकरेंमध्ये थेट हल्ला करण्याची हिंमत नाही. उद्धव ठाकरे थंड माणूस आहे. उद्धव ठाकरे थंड म्हणून आईस्क्रिमचा कोन मिळाला, अशी उपाहासात्मक टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

नितेश राणे म्हणाले, वैभव नाईकांनी चोऱ्यामाऱ्या करायच्या अन्‌ आम्हाला बोलणार. वैभव नाईकांनी एसीबीला उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी एसीबीला जाऊन कागदपत्रे द्यायला हवी होती. गैरव्यवहाराचे उत्तर वैभव नाईकांनी स्वत: द्यावे. नाईकांबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत. नाईकांची चौकशी झाली, त्याची कागदपत्रं दाखवू. आम्ही सुध्दा चौकशांना सामोरे गेलो आहोत. २००९ ला नाईकांची संपत्ती ५० लाख ते १ कोटी होती. आता ती ७ ते ८ कोटींवर गेली. नाईकांची मालमत्ता अशी कशी वाढली? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news