सांगली : आमदार अनिल बाबर यांच्या पत्‍नी शोभा बाबर यांचे निधन

शोभा बाबर
शोभा बाबर

विटा : पुढारी वृत्तसेवा; खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल कलजेराव बाबर यांच्या पत्नी सौ. शोभा बाबर तथा काकी यांचे आज (वय ६२) निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून त्यांना न्यूमोनियाचा त्रास होत होता. प्रारंभी त्यांना विटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्‍यांना पुणे येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

सौ. शोभा बाबर यांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्‍याने त्‍यांच्यावर विट्यात एका खासगी रूग्‍णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्‍याना दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची प्रकृती प्रारंभी स्थिर होती. परंतु त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत होता. आमदार अनिल बाबर हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत. मुलगा अमोल आणि सुहास आणि स्वतः आमदार अनिल बाबर हेदेखील पत्नीच्या उपचारावर सातत्याने लक्ष ठेवून होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी आमदार बाबर यांची थेट दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. दरम्यान शोभा बाबर यांच्या निधनाने संपूर्ण खानापूर मतदारसंघावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती, जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुहास बाबर आणि माजी नगरसेवक अमोल बाबर ही दोन मुले असा परिवार आहे.

आज सायंकाळी अंत्यसंस्कार 

शोभा बाबर यांच्यावर आज (बुधवार) सायंकाळी विटा आणि गार्डीच्या सीमेवर असलेल्या पवई टेक परिसरातील जीवन प्रबोधिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शोभा बाबर यांचे माहेर सातारा जिल्ह्यात…

शोभा बाबर यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९६० साली सातारा जिल्ह्यातील आर्वी (ता. कोरेगाव) येथे झाला. त्यांचे वडील दत्तात्रय बंडोबा जाधव-पाटील, हे आर्वी गावचे पोलीस पाटील होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. आमदार बाबर यांचे लग्न ते गार्डी (ता.खानापूर) चे सरपंच असताना २० मे १९७६ साली झाले.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news