पंढरपूर येथे रेल्‍वेच्या धडकेत ३ जण ठार १ जखमी | पुढारी

पंढरपूर येथे रेल्‍वेच्या धडकेत ३ जण ठार १ जखमी

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा मिरजहून कुर्डुवाडीकडे जाणाऱ्या मालवाहतूक रेल्वे गाडीने आज (बुधवार) पहाटे 4 वाजता पंढरपूर येथे 4 जणांना धडक दिली. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. या जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठार झालेल्यांची नावे समजू शकलेली नाहीत, मात्र हे सर्वजण छत्तीसगड येथील रहिवासी असल्याचे समजते.

मिरजहून कुर्डुवाडीच्या दिशेने निघालेली मालवाहतूक रेल्वे पंढरपूर येथे आली. दरम्‍यान पहाटे 4 वाजता नवीन कराड नाका परिसराजवळ असलेल्या पंढरपूर ते टाकळी दरम्यानच्या रेल्वे पुलावर ही घटना घडली.

रेल्वेची धडक इतकी जोरात होती की, यात तिघांचा मृत्‍यू झाला. या भीषण अपघातात शरीराचे अवयव इतरत्र पडले. पहाटे झालेली घटना सकाळी स्थानिकांच्या लक्षात आली. याबाबत स्थनिकांनी रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. खरच रेल्वे अपघात की घातपात की आत्महत्या, याबाबत अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

हेही वाचा :  

Back to top button