MissionLVM3 M2: पहिल्या व्यावसायिक, वजनदार रॉकेटच्या ऐतिहासिक प्रक्षेपणासाठी इस्रो सज्ज

isro launch course
isro launch course
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजे २३ ऑक्टोबरला, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) पहिल्या व्यावसायिक आणि सर्वात वजनदार, रॉकेटचे (MissionLVM3 M2) ऐतिहासिक प्रक्षेपण करण्यासठी सज्ज झाले असल्याची माहिती इस्रोने आपल्याला ट्विटरहून दिली आहे. ४३.५ मीटर उंच आणि ६४४ टन वजनाचे LVM3 M2 हे रॉकेट रविवारी (२३ ऑक्टो) सकाळी १२ वाजून ७ मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या मिशनची सर्व तयारी ही शनिवारी २२ ऑक्टोबरच्या मध्य रात्रीपासून  म्हणजेच ११ वाजून ३७ मिनिटांनंतर सुरू होणार आहे. हे आपल्याला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (इस्रो) सोशल साईटवरही पाहाता येणार असल्याचे इस्रोने सांगितले आहे.

Isro NSIL'S हे वजनदार रॉकेट GSLV MKIII (LMV-3) प्रथमच व्यावसायिक उपग्रह लाँन्च करत आहे ज्याचे वजन हे ५४०० किलोग्रॅम आहे. यामधून ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वनवेबचे (OneWeb) ३६ छोटे संवाद उपग्रह (कम्युनिकेशन सॅटेलाईट) अंतराळात (MissionLVM3 M2)  पाठवण्यात येणार आहेत. या कंपनीत एअरटेलची भारती एंटरप्रायजेस कंपनी ही शेअर होल्डर्स आहे. उपग्रहाचे हे प्रक्षेपण ऐतिहासिक आहे कारण, इस्रोकडून प्रक्षेपित होणारे हे पहिलेच व्यवसायिक प्रक्षेपण आहे. LVM -3 हे पहिल्यांदाच ५ टन वजनाचे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत घेऊन जात आहे.

इस्रो आणि ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वनवेब यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार LVM3 M2 या मिशनचे प्रक्षेपण करण्यात येत आहे. या ऐतिहासिक प्रक्षेपणामुळे यूजर्संना कम्युनिकेशन आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी या कंपनीने पृथ्वीच्या कक्षामध्ये ६५० उपग्रह (MissionLVM3 M2)  ठेवण्याची योजना आखली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news