खूषखबर : इस्रो सुरू करणार ‘हा’ फ्री कोर्स ; स्पेस सायन्समध्ये करिअर करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी | पुढारी

खूषखबर : इस्रो सुरू करणार 'हा' फ्री कोर्स ; स्पेस सायन्समध्ये करिअर करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : जर तुमचा इंट्रेस्ट स्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये आहे तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो ) आपल्यासाठी एक ऑनलाईन कोर्स घेऊन येत आहे. हा कोर्स पूर्णपणे मोफत असणार आहे. चला तर जाणून घेऊया या कोर्स संदर्भात…

इस्रोने विद्यार्थ्यांसाठी एका फ्री ऑनलाईन कोर्सची घोषणा केली आहे. या कोर्सचे नाव ‘ओवरव्यू ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी ‘ आहे. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ संदर्भातील विविध पैलूंची माहिती दिली जाणार आहे. या कोर्ससाठी भारतीय विद्यार्थ्यांबरोबरच परकीय विद्यार्थीसुद्धा सहभागी घेऊ शकतात. हा कोर्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS) द्वारे मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स (MOOC) च्या धरर्तीवर आयोजित केला जात आहे.

 केव्‍हा हाेणार सुरुवात ?

“Overview of Space Science and Technology” हा कोर्सची सुरूवात ही ५ जूनपासून होणार असून ५ जुलैपर्यंत हा कोर्स असणार आहे.10 तासांच्या या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये ऑनलाइन व्हिडीओ पाहता येणार आहेत. विद्यार्थ्यांना नीट समजेपर्यंत या कोर्सचा व्हिडीओ पाहता येतील. विद्यार्थ्याने व्हिडीओ पाहिल्यानंतर यावर आधारित प्रश्नमंजुषाही घेण्यात येणार आहे.

अर्ज करण्‍यासाठी पात्रता

हा अभ्यासक्रम भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. तुमचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या कोर्समध्ये भाग घेऊ शकता. भारतीय पालक आपल्या पाल्यासाठी या कोर्सची निवड करू शकतात.

असा करा अर्ज

या अभ्यासक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (आयआयआरएस) (https://isat.iirs.gov.in/mooc.php) या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथे जाऊन नोंदणी करावी लागेल. ई-मेलवर मिळालेल्या क्रेडेंशिलद्वारे या लेक्चरला उपस्थित राहता येईल. देशातील नामवंत स्पेस साइंटिस्ट या कोर्समध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. विशेषत: ज्या विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये करिअर करायचे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे.

कोर्सची वैशिष्ट्ये

हा कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ७० टक्के असेल आणि ज्यांना प्रश्नमंजुषामध्ये किमान ६० टक्के गुण मिळतील त्यांना इस्रोकडून प्रमाणपत्र दिले जाईल.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button