hbd aishwarya rai : जेव्हा ऐश्वर्याला सुष्मितापेक्षा सरस उत्तर देता आलं नाही…

hbd aishwarya rai : जेव्हा ऐश्वर्याला सुष्मितापेक्षा सरस उत्तर देता आलं नाही…
Published on
Updated on

मिस वर्ल्डचा मुकुट परिधान करून ऐश्वर्या रायने संपूर्ण जगात भारतीय सुंदरतेचे दर्शन घडवलं. परंतु, १९९४ मध्‍ये 'फेमिना मिस इंडिया'च्‍या स्‍पर्धेत सुष्मिता सेनने दिलेल्‍या एका उत्तरामुळे ऐश्‍वर्याला 'मिस इंडिया'चं मुकूट मिळवता आलं नाही. ऐश्‍वर्या केवळ २ गुणांनी हारली होती. आज ऐश्वर्या रायचा (१ नोव्हेंबर) वाढदिवस आहे. (hbd aishwarya rai) तिला 'मिस इंडिया' मिऴवता आलं नसलं तरी ती अजुनही तितकीच सौंदर्याची हकदार आहे. १९९४ मध्ये झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत ऐश्वर्या आणि सुष्मिता यांच्यात टक्कर झाली होती. पाहुया, त्यावेळी काय घडलं होतं? (hbd aishwarya rai)

फेमिना मिस इंडियामध्‍ये ९.३३ गुणांवर टाय

गोव्‍यात झालेल्‍या स्‍पर्धेत ऐश्‍वर्या आणि सुष्‍मिता सेनला एकसारखे गुण मिळाले होते. दोघींच्‍यात ९.३३ गुणांवर टाय झाला होता. जजेसनी टाय ब्रेक करण्‍यासाठी दोघींना एक-एक प्रश्‍न विचारला होता. ज्‍यामध्‍ये ऐश्वर्याला विचारण्‍यात आलं होतं की, 'जर तुला तुझ्‍या पतीमध्‍ये कोणते गुण आहेत, हे शोधायचं असेल तर तू काय करशील? समज, तुला द बोल्ड ॲण्‍ड ब्यूटीफुलचे रिज फॉरेस्टर आणि सांता बारबराच्‍या मेसन कॅपवेल यांच्‍यापैकी कुणाला निवडशील?' ऐश्वर्याने उत्तर दिलं…'मेसन.' ती म्‍हणाली, 'कारण आमच्‍या दोघांत अनेक सारख्‍या गोष्‍टी आहेत. मेसनचा स्‍वभाव खूप केअरिंग आहे आणि त्‍यांचा सेन्‍स ऑफ ह्यूमर देखील चांगलं आहे.'

सुष्मिताने दिलेल्या उत्तराने नशीब उजळलं

सुष्मिता सेनला विचारण्‍यात आलं होतं की, 'आपल्‍या देशातील टेक्सटाईल हेरिटेजबद्‍दल काय जाणतेस? हे किती जुनं आहे आणि तुला घालायला आवडेल?' सुष्‍मिता म्‍हणाली, 'मला वाटतं की, हे सर्व महात्मा गांधी यांच्‍या खादीपासून सुरू झालं होतं. तेव्‍हापासून याचा दीर्घकाळ प्रवास आहे. परंतु, टेक्साटाईल हेरिटेजच्‍या मूळ गोष्‍टी तेथूनच आहेत.'

मिस इंडियाच्‍या फायनल राउंडमध्‍ये ऐश्वर्या-सुष्मिता या दोघींच्‍यामध्‍ये टक्कर पाहायला मिळाली होती. सुष्मिताला विचारण्‍यात आलं होतं की, 'जर तू एखाद्‍या ऐतिहासिक घटनेला बदलू शकली असतीस तर ती कुठली गोष्‍ट असती?' यावर सुष्मिताने म्‍हटलं होतं, 'इंदिरा गांधी यांचा मृत्यू'.

या एका उत्तराने सुष्मिताचं भाग्‍य उजळलं आणि ती 'मिस इंडिया' बनली. टाय ब्रेकअपनंतर 'मिस इंडिया'चा मुकूट सुष्‍मिता सेनला परिधान करण्‍यात आला. (१९९४) ऐश्‍वर्याला केवळ २ गुणांनी ही स्‍पर्धा जिंकता आली नव्‍हती.

स्‍पर्धेत होस्‍ट म्‍हणून हे दिग्गज उपस्‍थित

स्‍पर्धेत होस्ट म्‍हणून दिलीप ताहिल उपस्‍थित होते. तर माजी मिस इंडिया स्‍पर्धक नम्रता शिरोडकर, पूजा बत्रा आणि तरविंदर कौर देखील उपस्‍थित होते.

हेही वाचलं का ?

photo – lovely_aishwarya वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news