Mirabai Chanu : वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूची रौप्य पदकावर मोहर

Mirabai Chanu
Mirabai Chanu
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारताची मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिने रौप्यपदकावर आपली मोहर उमटवली. मीराबाई चानूने 8७ किलो स्नॅच आणि ११३ किलो क्लीन अँड जर्क असे एकूण २०० किलो वजन उचलले. दरम्‍यान, चीनच्या जियांग हुइहुआने २०६ किलो एकत्रित वजनासह सुवर्णपदक पटकावले. मीराबाईचे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील हे दुसरे पदक आहे. यापूर्वी तिने २०१७ मध्ये १९४ किलो (८५ किलो स्नॅच आणि १०९ किलो क्लीन अँड जर्क) वजन उचलून सुवर्णपदक जिंकले होते.

मीराबाई काही काळापासून मनगटाच्या दुखापतीशी झुंजत होती, काही काळ खेळापासून दूर होती. मात्र, आता तिने जोरदार पुनरागमन केले आहे.

पॅरिस ऑलिम्पिकचा रस्ता सोपा 

मीराबाईच्या दुखापतीचा परिणाम तिच्या खेळावर कुठेतरी दिसत होता. या कारणास्तव, ती केवळ मुख्य स्पर्धांमध्ये भाग घेत होती. पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट कापण्यासाठी ही जागतिक स्पर्धा खूप महत्त्वाची होती. मीराबाईला येथे मिळालेल्या रौप्यपदकामधून महत्त्वाचे गुण मिळाले, जे अंतिम पात्रता क्रमवारीत उपयुक्त ठरतील. मीराबाईची नजर आता पुढील वर्षी होणाऱ्या 2023 वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि 2024 च्या वर्ल्ड कपवर असेल, जिथे भाग घेणे तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news