तिहार तुरुंगात मंत्री सत्येंद्र जैन यांची बडदास्त; ईडीच्या दाव्यावर केंद्राने मागविला अहवाल

सत्येंद्र जैन
सत्येंद्र जैन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तिहार तुरुंगात मंत्री सत्येंद्र जैन यांची मोठी बडदास्त ठेवली जात असून त्यांचा तुरुंगात मसाजही केला जात असल्याचा दावा सक्तवसुली संचलनालयाने केला होता. या दाव्याची दखल घेत केंद्र सरकारने दिल्लीतील केजरीवाल सरकारकडून अहवाल मागविला आहे.

मागील काही महिन्यांपासून सत्येंद्र जैन तिहार तुरुंगात बंद आहेत. ईडीने त्यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. जैन हे तुरुंगात नियमांचे उल्लंघन करीत असून तुरुंगात त्यांचा मसाजदेखील केला जात असल्याचे ईडीने तक्रारीत म्हटले होते. याबाबत न्यायालयात सीसीटीव्ही फुटेज सादर करण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दिल्ली सरकारच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागविला आहे. तुरुंग अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी करून जैन हे सुविधांचा लाभ उठवत असल्याचा ईडीचा आरोप आहे.

सत्येंद्र जैन यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी तुरुंग अधीक्षक दररोज त्यांना भेटत असतात. न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून त्यांना रोज घरचे जेवणही दिले जाते. सत्येंद्र जैन यांना त्यांच्या पत्नीची वरचेवर भेट घालून दिली जाते, आदी आरोपही ईडीकडून करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news