Election Commission : गुजरात विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबरला मतदान, हिमाचलसोबतच ८ डिसेंबरला निकाल | पुढारी

Election Commission : गुजरात विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबरला मतदान, हिमाचलसोबतच ८ डिसेंबरला निकाल

पुढारी ऑनलाइन डेस्क : गुजरात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान घेण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होईल. तर ८ डिसेंबरला हिमाचल प्रदेश सोबत गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.

निवडणूक आयोगाने आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने माहिती दिली. सुरुवातीला आयोगाकडून मोरबी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

गुजरात विधानसभेत 182 जागा आहेत. पहिल्या टप्प्यात 89 आणि दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर निवडणूक होणार आहेत.

गुजरातमध्ये, 10.10.2022 रोजी प्रकाशित झालेल्या मतदार यादीनुसार, 4.9 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत, त्यापैकी ~ 4.04 लाख PwD मतदार आहेत; 9.8 लाख 80+ ज्येष्ठ नागरिक आणि 4.61 लाख प्रथमच मतदार: CEC कुमार

गुजरातमधील 3.24 लाख अतिरिक्त मतदार पहिल्यांदाच मतदान करण्यास पात्र असतील: EC

गुजरातमध्ये 142 सामान्य, 17 SC आणि 23 ST मतदारसंघ, – CEC राजीव कुमार

दिव्यांगांसाठी खास 152 मतदान केंद्र असतील

महिलांसाठी 1274 मतदान केंद्र असतील ज्याचे व्यवस्थापन पूर्णपणे महिलांकडूनच करण्यात येईल.

प्रथमच, तरुण मतदारांना प्रेरित करण्यासाठी, सर्वात तरुण उपलब्ध मतदान कर्मचार्‍यांकडून 33 मतदान केंद्रे व्यवस्थापित केली जातील.

गेल्या वेळी गुजरात निवडणुका दोन चरणांमध्ये झाल्या होत्या. 25 ऑक्टोबर 2017 मध्ये निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या. 14 नोव्हेंबरला अधिसूचना काढण्यात आली तर 20 नोव्हेंबरला दुस-या चरणातील मतदान पार पडले होते. पहिल्या टप्प्यात 89 तर दुस-या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यातील मतदानाचे निकाल 9 डिसेंबर तर 14 डिसेंबरला दुस-या टप्प्यातील निकाल जाहीर करण्यात आले होते.

2017 च्या निवडणुकीत होता अतीतटीचा संघर्ष

गुजरातमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली 2002 च्या निवडणुका जिंकल्यानंतर 2007, 2012 तिन्ही वेळा भाजपने दणदणीत विजय मिळवत सत्ता हस्तगत केली होती. 2017 च्या निवडणुकांमध्ये भाजपने निवडणूक जिंकली मात्र ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत अनेक जागांवर आघाडी मिळवली. 2017 ची निवडणूक जिंकणे हे मोदींसाठी प्रचंड प्रतिष्ठेचे बनले होते. या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपला 100 च्या आत 99 जागांवर समाधान मानावे लागले होते.

यंदा 2023 ची निवडणूक त्रिकोणी लढत

गेल्या 24 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपने आपली सत्ता राखून ठेवली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली होती तरी देखिल संघर्षपूर्ण लढतीत भाजपने निवडणुका जिंकल्या होत्या. गेल्या वेळी गुजरातमध्ये भाजपला फक्त काँग्रेसचेच आव्हान होते. मात्र, यावेळी आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीसाठी ताकद लावली आहे. आपने यापूर्वी दिल्ली आणि पंजाबमध्ये विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाने आपला मोर्चा गुजरातकडे वळवला आहे. यासाठी आपने गेल्या अनेक दिवसांपासून गुजरातमध्ये पक्ष मजबूत करण्याकडे लक्ष दिले आहे. पंजाबमधील कॅम्पेन आपने गुजरातमध्येही चालवले आहे. तुम्हीच ठरवा कोण असावा मुख्यमंत्र्यांचा चेहरा, हे कॅम्पेन सुरू केले आहे. त्यामुळे यंदाची गुजरात निवडणूक लढत ही तिरंगी होणार आहे.

हे ही वाचा :

Bypoll : महाराष्ट्रासह 6 राज्यांतील 7 विधानसभांच्या जागांवर पोटनिवडणुकीसाठी, मतदान सुरू

Stock Market | फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीचे शेअर बाजारात पडसाद, सेन्सेक्स, निफ्टीत चढ-उतार

Back to top button