Microsoft launches Jugalbandi | जुगलबंदी चॅटबॉट लाँच! देशातील ग्रामीण लोकांना देणार योजनांची माहिती, जाणून घ्या ‘हे’ कसे काम करेल?

Microsoft launches Jugalbandi | जुगलबंदी चॅटबॉट लाँच! देशातील ग्रामीण लोकांना देणार योजनांची माहिती, जाणून घ्या ‘हे’ कसे काम करेल?

पुढारी ऑनलाईन : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) जगभरात विस्तार होत आहे. आता मायक्रोसॉफ्टने मंगळवारी एक जनरेटिव्ह एआय-चलित बहुभाषिक चॅटबॉट (multilingual chatbot) लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपच्या (WhatsApp) माध्यमातून लाँच केले. (Microsoft launches Jugalbandi) या एआय चॅटबॉटचे नाव जुगलबंदी (Jugalbandi) असे आहे. हे खासकरून ग्रामीण भारतातील अशा क्षेत्रांसाठी बनवले गेले आहे जिथे माध्यम आणि सरकारचे कल्याणकारी उपक्रम सहजासहजी पोहोचत नाहीत. या एआय चॅटबॉटच्या मदतीने ग्रामस्थांना शासनाचे कल्याणकारी उपक्रम आणि योजनांची माहिती घेता येणार आहे.

"मी नुकतीच भारताला भेट दिली तेव्हा मी याची चाचणी घेतली होती आणि मला दोन जाणीव जाणवल्या. प्रथम आपण काही गोष्टी तयार करू शकतो ज्यामुळे केवळ लोकांच्या एका छोटाशा गटाला नाही तर ८ अब्ज लोकांमध्ये त्याचा फरक पडू शकतो. यासह आम्ही मूलभूत अधिकारांचे संरक्षण देखील सुनिश्चित करतो," असे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी जुगलबंदी लाँचवेळी बोलताना सांगितले.

या एआय चॅटबॉटचा उद्देश काय?

हे चॅटबॉट AI4Bharat ने IIT मद्रासच्या सहकार्याने विकसित केले आहे. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, अनेक भाषांमधील यूजर्संच्या प्रश्नांना समजून घेऊन वैयक्तिकरित्या मदत प्रदान करण्याचा यामागील उद्देश आहे. या एआय चॅटबॉटचा वापर ग्रामीण भागातील लोक व्हॉटसॲपच्या माध्यमातून करु शकतात. यामुळे ते कोणत्याही सरकारी योजनांपासून दूर राहणार नाहीत. जुगलबंदी चॅटबॉट १० भाषा समजू शकते. हे टायपिंग आणि व्हॉइस नोट्स दोन्ही समजू शकते.

जुगलबंदी कसे काम करते?

युजरकडून प्रश्न आल्यानंतर हे चॅटबॉट संबंधित प्रोग्राममधून माहिती मिळवते. ही माहिती फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध असते. पण जुगलबंदी यूजर्संना त्यांच्या स्थानिक भाषेत माहिती सादर करते. मायक्रोसॉफ्टच्या मते, जुगलबंदी हे AI4Bharat आणि Microsoft Azure OpenAI सेवेच्या AI मॉडेल्सला एकत्र करते. यामुळे यूजर्स आणि चॅटबॉट्स यांच्यात सहजपणे संवाद होऊ शकतो. जुगलबंदीची चाचणी नवी दिल्लीजवळील एका गावात घेण्यात आली होती.

हे जनरेटिव्ह एआय टूल्स टेक्स्ट आणि इतर प्रकारचा कंटेट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेटाचे एकत्रिकरण करू शकते. जुगलबंदी भारत सरकारचा डेटाबेस घेऊन यूजर्संसाठी एक विश्वासार्ह आणि प्रतिसाद देणारा प्लॅटफॉर्म ऑफर करते आणि त्याच वेळी ते Azure OpenAI सेवेद्वारे डेटा सुरक्षितता सुनिश्चित करते, असे Microsoft ने म्हटले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news