MI vs GT Qualifier 2 : शुभमनच्या तडाख्यात मुंबई बेजार

MI vs GT Qualifier 2 : शुभमनच्या तडाख्यात मुंबई बेजार
Published on
Updated on

अहमदाबाद; वृत्तसंस्था : शुभमन गिलने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. मागील चार डावांतील तिसरे शतक झळकावताना त्याने गुजरात टायटन्सला दोनशेपार नेले. टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा यांनी सोडलेले त्याचे झेल मुंबई इंडियन्सला महागात पडले. मुंबई इंडियन्सचे आज सर्व डावपेच चुकले.

शुभमन आणि वृद्धीमान साहा (18) यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पियुष चावलाने गुजरातला पहिला धक्का दिला. त्यानंतर शुभमन व साई सुदर्शन यांचाच बोलबाला राहिला. शुभमनने 49 चेंडूंत 4 चौकार व 8 षटकारांसह यंदाच्या पर्वातील तिसरे शतक झळकावले. साई सुदर्शनने दुसर्‍या विकेटसाठी शुबमनसह 64 चेंडूंत 138 धावांची भागीदारी केली. शुभमनचा प्रत्येक फटका आज वाखाण्यजोगा होता आणि त्यात कोणताच आक्रसताळेपणा नव्हता. तंत्रशुद्ध फलंदाजी कशी करावी अन् मनगटाचा सुरेख वापर करून चेंडू कसा भिरकावा हे आज शुभमनने दाखवून दिले. त्याचे फटके नेत्रदीपक होते अन् रोहितनेही त्याचे कौतुक केले. 17 व्या षटकात मधवालने महत्त्वाची विकेट मिळवून दिली. शुभमन 60 चेंडूंत 7 चौकार व 10 षटकारांसह 129 धावांवर झेलबाद झाला.

शुभमनच्या फटकेबाजीने मुंबईचे गोलंदाज गांगरले होते आणि सुदर्शन व हार्दिक पांड्या यांनी याचा पूरेपूर फायदा उचलला. सुदर्शनला 43 (31 चेंडू) धावांवर रिटायर्ड आऊट व्हावे लागले, राशीद खान मैदानावर आला अन् त्याने चांगले फटके मारले. हार्दिकने 13 चेडूंत 28 धावा करताना गुजरातला 3 बाद 233 धावांपर्यंत पोहोचवले.

खर्‍या पावसानंतर शुभमनने पाडला धावांचा पाऊस

हंगामात झळकावले तिसरे शतक

पावसामुळे टॉसला 45 मिनिटे उशीर झाला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यात भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने तुफानी शतक झळकावले. सध्या सुरू असलेल्या हंगामात त्याचे हे तिसरे शतक आहे. शुभमन गिलच्या बॅटने यावर्षी सातत्याने धावा काढल्या आहेत आणि आयपीएल 2023 च्या मोसमात त्याने सर्व फलंदाजांना मागे टाकले आहे. गुजरात टायटन्सच्या युवा सलामीवीराने क्वॉलिफायर-2 मध्येही मुंबई इंडियन्सविरुद्ध चांगली कामगिरी केली आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट शतक झळकावले. गिलचे या मोसमातील हे तिसरे शतक आहे. या डावात त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीचे योगदान जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याला साथ देणार्‍या मुंबईच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचे देखील आहे.

मुंबईची एक चूक महागात पडली

या मोसमात 700 हून अधिक धावा करणार्‍या गिलने या सामन्यातही चांगली सुरुवात केली आणि पॉवर-प्लेमध्ये धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर सहाव्या षटकात ख्रिस जॉर्डन गोलंदाजीला आला आणि गिलने सुरुवातीलाच एक षटकार आणि एक चौकार लगावला. जॉर्डनने अशी सुरुवात करून संधी निर्माण केली. मिडऑनला गिलने ओव्हरचा पाचवा चेंडू मारला. तिथे तैनात असलेल्या टीम डेव्हिडला कॅच घेण्याची संधी होती; पण डेव्हिडने उजवीकडे डायव्हिंग करूनही ही संधी सोडली. त्याच्या हातातून चेंडू बाहेर आला. त्यावेळी गिलची धावसंख्या 20 चेंडूत केवळ 30 धावा केल्या होत्या. शेवटी त्याच डेव्हिडने मधवालच्या गोलंदाजीवर झेल पकडला. त्याने 60 चेंडूत 129 धावा केल्या. त्याच्या अफलातून, अविश्वसनीय खेळीत 10 उत्तुंग षटकार आणि 7 चौकार मारत 215च्या स्ट्राईक रेटने शतक झळकावले.

ऑरेंज कॅपवर दावा

या डावात 9 धावा करताच शुभमन गिलने ऑरेंज कॅपवरही आपली दावेदारी सांगितली आहे. त्याचवेळी त्याच्या नावावर 800च्या वर धावा झाल्या आहेत आणि या खेळाडूने ऑरेंज कॅप जवळजवळ निश्चित केली आहे. प्ले-ऑफमध्ये उपस्थित असलेला एकही खेळाडू त्याच्या आसपास नाही. गिलने यापूर्वी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 58 चेंडूत 101 आणि आरसीबीविरुद्ध 52 चेंडूत नाबाद 104 धावा केल्या होत्या.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news