MHADA : म्हाडा वर्षभरात बांधणार १५ हजार ७८१ सदनिका

MHADA : म्हाडा वर्षभरात बांधणार १५ हजार ७८१ सदनिका
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण या म्हाडाच्या  (MHADA) प्रादेशिक मंडळांतर्फे एकूण १५ हजार ७८१ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी म्हाडाच्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ७०१९.३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत ४ हजार ६२३ सदनिका बांधल्या जाणार आहेत.

म्हाडाचा (MHADA) २०२१-२२ चा सुधारित अर्थसंकल्प व २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास सादर करण्यात आला. २०२२-२०२३ च्या १०७६४.९९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास व २०२१-२०२२ च्या सुधारित ७९७६.७४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता मिळाली. २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पात २८८५.९२ कोटी रुपये तूट, तर २०२१-२०२२ च्या सुधारित अर्थसंकल्पात १००९.०२ कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे.

मुंबई मंडळासाठी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ३७३८.४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास योजनेसाठी २१३२.३४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अँटॉप हिल वडाळा येथील गृहनिर्माण योजनेसाठी २९ कोटी , बॉम्बे डाईंग मिल वडाळा योजनेसाठी ६४ कोटी , कोपरी पवई येथील गृहनिर्माण योजनेसाठी १४५.५४ कोटी, मागाठाणे बोरिवली येथील योजनेसाठी ५० कोटी, खडकपाडा दिंडोशी येथील गृहनिर्माण योजनेसाठी १५ कोटी, पहाडी गोरेगाव येथील गृहनिर्माण योजनेसाठी २५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. सिद्धार्थनगर (पत्राचाळ), गोरेगाव प्रकल्पासाठी ४३५ कोटी, धारावी पुनर्विकास प्रकल्प टप्पा ब साठी ९१.१८ कोटी , गृहनिर्माण भवन इमारतीची दुरुस्ती व पुनर्विकासासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कोकण मंडळ :

१९७१.५० कोटी रुपयांची तरतूद. ७ हजार ५९२ सदनिका उभारणार. वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासासाठी २०० कोटी. तसेच मफतलाल (जि. ठाणे) येथील भूसंपादन व भूविकासासाठी १००२.५० कोटी

पुणे मंडळ :

६६४.३२ कोटीची तरतूद. १ हजार २५३ सदनिका बांधणार. धानोरी येथे भूसंपादन व भूविकासासाठी ३८० कोटी रुपयांची तरतूद.

नागपूर मंडळ :

३८८.९७ कोटी रुपयांची तरतूद. १९५ सदनिका बांधणार. भूसंपादन व भूविकासासाठी १६९.९२ कोटी .

औरंगाबाद मंडळ :

१३६.९० कोटी रुपयांची तरतूद. १७६२ सदनिका उभारणार .

नाशिक मंडळ :

३५.७२ कोटी रुपयांची तरतूद. २२० सदनिका बांधणार.

अमरावती मंडळ :

७५.५७ कोटी रुपयांची तरतूद. १३६ सदनिका उभारणार .

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news