MG Motor ची इलेक्ट्रिक SUV कार भारतात लॉंच होणार, जाणून घ्या फिचर्स

MG Motor ची इलेक्ट्रिक SUV कार भारतात लॉंच होणार, जाणून घ्या फिचर्स
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ खूप वाढत आहे. एम जी मोटर (MG Motor) ही कंपनीदेखील आता भारतीय ग्राहकांसाठी MG ZS EV ही नवी SUV कार घेऊन येत आहे. विशेष म्हणजे एम जी कंपनीने ही ग्राहकांसाठी आणलेली आकर्षक कार इलेक्ट्रिक पद्धतीमध्ये असणार आहे.

एमजी (MG) मोटर कार भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आता कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) उत्पादनाचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीची MG ZS EV ही इलेक्ट्रिक कार ही जुलैमध्ये लॉंच करण्यात येईल अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

ही SUV कार आकर्षक डिझाइन आणि आकर्षक फिचर्ससह लांब श्रेणीमध्ये भारतात पहायला मिळेल. MG ZS EV मध्ये 50.3 KWh बॅटरीसह प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. ही एका चार्जवर 461 किलोमीटरची रेंज देणारी कार असणार आहे.

MG ZS EV ची वैशिष्ट्ये

डायनॅमिक लाइन्स आणि एक मोठी एसयूव्ही असे एकत्रित कॅाम्बिनेशन केलेल्या एका अनोखी शैलीमध्ये नवीन ZS EV दिसेल. Excite आणि Exclusive अशा दोन पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध असेल.

ही कार आरामदायी आहे. तसेच प्रीमियम इंटिरियर्स, ड्युअल पेन पॅनोरामिक स्कायरूफ, डिजिटल ब्लूटूथ की, रीअर ड्राइव्ह असिस्ट, 360 डिग्री कॅमेरा, 75 हून अधिक कनेक्ट केलेल्या वैशिष्ट्यांसह i-स्मार्ट या प्रगतशील तंत्रज्ञानासह सुसज्ज असेल.

त्याचबरोबर यामध्ये जगभरातील प्रमाणित अशा ASIL-D, IP-69K आणि UL 2580 या बॅटरी आहेत. एक मुख्य वैशिष्य हे आहे की, विशिष्ट अशा यशस्वी 8 सुरक्षा चाचण्यांनी सुसज्ज सुरक्षा फिचर्स यामध्ये समाविष्ट आहेत. आग, धडक, धूळ, माती आणि धूर यांच्यापासून बचावाशी संबंधित हे सुरक्षा तंत्रज्ञान काम करेल.

नवीन आणि सर्वोत्तम असे तंत्रज्ञान

ZS EV मध्ये नवीन वैशिष्ट्यांच्या तुलनेने मोठी यादी आहे. संपूर्ण डिजिटल क्लस्टरमध्ये ही 17.78 सेमी (7.0 इंच) LCD स्क्रीन आहे. यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 10.1-इंच एचडी टचस्क्रीन, वायरलेस फोन चार्जिंग, 5 यूएसबी पोर्ट आणि 2 सी टाइप चार्जिंग पोर्ट आहेत.

त्याचबरोबर ऑटो एसी आणि पीएम 2.5 फिल्टरने सुसज्ज तंत्रज्ञान तापमान नियंत्रित करते. यात प्रवास सुकर करण्यासाठी 75 पेक्षा जास्त वैशिष्ट्यांसह आधुनिक i-Smart कनेक्टिव्हिटी प्रणाली देखील समाविष्ट आहे. नवीन ZS EV मध्ये डिजिटल ब्लूटूथ देखील समाविष्ट आहे. ज्यामुळे ग्राहकांना काही अडचणीच्या वेळी चावीशिवाय कार चालवता येते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news