क्रूर आई! २ महिन्यांच्या चिमुकलीची केली हत्या अन् मृतदेह ओवनमध्ये लपविला

क्रूर आई! २ महिन्यांच्या चिमुकलीची केली हत्या अन् मृतदेह ओवनमध्ये लपविला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आई म्हटलं की, आपल्या मुलांसाठी वाट्टेल तो त्याग करण्यासाठी तयार असणारी ती स्त्री असते. पण, हीच आई लिंगभेद करत पोटच्या मुलीची क्रूर हत्या करते तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. अशीच एक घटना दक्षिण दिल्लीतील मालवीयनगरमध्ये घडली आहे. एका आईने आपल्या २ महिन्यांच्या अनन्या कौशिक नावाच्या मुलीचा गळा दाबून मायक्रोवेव्ह ओवनमध्ये लपवून ठेवला. नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिली तेव्हा पोलीस तपासात कौशिकाचा मृतदेह ओवनमध्ये आढळून आला.

अनन्या कौशिक नावाच्या चिमुकलीचा मृतदेह अवघ्या दोन तासांत पोलिसांनी शोधून काढला. शवविच्छेदन करण्यासाठी अनन्येचा मृतदेह रुग्णालयात पाठवलेला आहे. अनन्येच्या आईचं नाव आहे डिम्पल कौशिक. सध्या पोलिसांनी तिला अटक केली असून चौकशी करत आहेत. या प्रकरणासंदर्भात दक्षिण जिल्हा डीसीपी बेनिटा मेरी जॅकर यांनी सांगितले की, "अनन्याच्या नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. मुख्य आरोपी असणारी आई डिम्पल हिने दुसरी मुलगी झाल्यामुळे ती नाराज होती. त्यातून आईने हे कृत्य केलेले आहे."

आई डिम्पलने २ महिन्याच्या अनन्याची अशी केली क्रूर हत्या…

पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, गुलशन कौशिक यांचे कुटुंब चिराग दिल्ली येथे राहते. त्यांच्या कुटुंबात पत्नी डिम्पल यांच्याशिवाय ४ वर्षांचा मुलगा आणि दोन महिन्यांची मुलगी अनन्या कौशिक होते. त्याचबरोबर गुलशन यांची आई आणि भाऊदेखील राहतात. त्याचबरोबर ते घरात किराणा मालाचे दुकानही चालवतात.

सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास डिम्पलने आपली २ वर्षांच्या मुलीचा म्हणजेच अनन्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खराब झालेल्या ओवनमध्ये ठेवले. त्यानंंतर ती पहिल्या मजल्यावरील घरात परतली. ती आपल्या मुलाला मारू लागली. पती, सासू आणि दीर दुकानात बसले होते. घरात चाललेला गोंधळ ऐकून ते वर आले, तर डिम्पल आपल्या ४ वर्षांचा मुलाला मारत होती.

डिम्पलने घर आतून बंद होते. शेवटी दरवाजा तोडून नातेवाईकांना आत जाऊन मुलाला वाचवले. त्याच दरम्यान डिम्पल बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात गेल्यानंतर बेशुद्धा पडल्याचे ढोंग डिम्पलने केलेले होते, हे सिद्ध झाले. तेव्हा घरातील लोकांना लहान मुलीच्या जीवाची चिंता सतावू लागली. मुलीची शोधाशोध सुरू झाली. तेव्हा दुसऱ्या मजल्यावरील बंद पडलेल्या मायक्रोवेव्ह ओवनमध्ये २ महिन्यांचा अनन्याचा मृतदेह आढळून आला. तिला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. पण, डाॅक्टरांना तिला मृत घोषीत केले. सध्या पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

हे वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news