Racial Attack on Indians : चार भारतीय महिलांवर अमेरिकेत हल्ला, ‘Go back to India’ म्हणत बंदूक रोखली

Racial Attack on Indians : चार भारतीय महिलांवर अमेरिकेत हल्ला, ‘Go back to India’ म्हणत बंदूक रोखली

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील टेक्सासमधील प्लॅनो शहर पोलिसांनी एका मेक्सिकन अमेरिकन महिलेलेला गुरूवारी (दि. २५) अटक केली आहे.  ४ भारतीय महिलांना दहशतवादी धमक्या (Racial Attack on Indians) देत हल्ला केल्याबद्दल मेक्सिकन अमेरिकन महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार चार भारतीय महिलांच्या बाबतील रेस्टॉरंटच्या बाहेर आल्यानंतर पार्किंगमध्ये घडला. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाली आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे.

ही घटना बुधवारी (दि.२४) रात्री उशीरा घडली. चार भारतीय महिला रेस्टॉरंटमधून (Racial Attack on Indians)  जेवण करून बाहेर आल्यानंतर संशयित महिलेने अचानक मी भारतीयांचा तिरस्कार करते (i heat indians…), मी अमेरिकेत जन्माला आले पण इथेही सर्व भारतीयच दिसतात. तुम्ही भारत सोडून इकडे कशाला येता ('Go back to India'), असे म्हणत तिने चार भारतीय महिलांवर हल्ला केला. तिने आपल्या बॅगेतील बंदूक काढत त्यांच्यावर रोखण्याचाही प्रयत्न केला.

या घटनेचा व्हिडिओ यामधीलच एका भारतीय अमेरिकन महिलेच्या मुलाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या घटनेनंतर मेक्सिकन महिलेला प्लानो शहर पोलिसांनी अटक करत, १० हजार अमेरिकन डॉलर इतका दंडही (Racial Attack on Indians) ठोठावला आहे. तसेच तिच्यावर वर्णभेद करणे आणि दहशतवादी धमक्या दिल्याप्रकरणी कारवाई कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news