Aamir Khan : ‘लाल सिंह चड्ढा’च्या अपयशानंतर आमिर खान जाणार ब्रेकवर, अमेरिकेत घेणार विश्रांती

Aamir Khan : ‘लाल सिंह चड्ढा’च्या अपयशानंतर आमिर खान जाणार ब्रेकवर, अमेरिकेत घेणार विश्रांती

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. आमिर खानला या चित्रपटाकडून खूप आशा होत्या. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो बराच वेळ गुंतला होता. आमिरचा प्रत्येक चित्रपट वेगळा असतो. या चित्रपटावरही त्यांने खूप मेहनत घेतली होती, मात्र त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला होता. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी या चित्रपटाला प्रचंड विरोध केला आणि अशा परिस्थितीत चित्रपटाचा परफॉर्मन्स खूपच खराब झाला.

असे मानले जात होते की आमिर (Aamir Khan) आता त्याच्या पुढच्या चित्रपटात काम करेल, परंतु नुकत्याच आलेल्या बातम्यांनुसार आमिर खानने दोन महिन्यांच्या अमेरिकेच्या ट्रिपची योजना आखली आहे. मिड डेच्या रिपोर्टनुसार, आमिर गेल्या तीन वर्षांपासून अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटावर काम करत होता.

आता आमिर खान (Aamir Khan) त्याचा पुढचा प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी थोडा वेळ विश्रांती घेणार आहे. 'लाल सिंग चड्ढा'बद्दल चाहत्यांची प्रतिक्रिया हृदय पिळवटून टाकणारी आहे. पुढील काही आठवडे या त्याला सुट्टीवर जायचे असून हा चित्रपट परदेशात प्रदर्शित करण्याची त्याची योजना आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस तो स्पोर्टस् ड्रामाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news