Mega Job Fair : ‘मेगा जॉब फेअर’ मधून युवकांना मिळणार रोजगाराच्या असंख्य संधी

Mega Job Fair
Mega Job Fair

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या काही वर्षांत शैक्षणिकसह सर्वच क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो तरुण बेरोजगार झाले असून करिअरचे काय? असा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत युवकांना रोजगाराची नवी दिशा दाखविण्यासाठी व उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी नामांकित कंपन्यांमधील नोकरीच्या संधी मौनी विद्यापीठ गारगोटी येथे रविवारी (दि. 5 फेब्रुवारी) होणार्‍या 'मेगा जॉब फेअर'मधून मिळणार आहेत. (Mega Job Fair)

दैनिक 'पुढारी' संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशन व श्री सन्मित्र सोशल फाऊंडेशन, गारगोटी यांचा संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे.

स्पर्धेच्या युगात करिअर संदर्भात नामांकित कंपन्यांमधील रोजगाराच्या संधी व मार्गदर्शन दहावी, बारावी, आयटीआय, पॉलिटेक्निक, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर, इंजिनिअरिंग, फार्मसी क्षेत्रातील फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना एकाच छताखाली मिळणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मेगा जॉब फेअर होणार आहे. कुशल मनुष्यबळाच्या शोधात असणाऱ्या नामवंत आयटी, मॅन्युफॅक्चरिंग व ऑटोमोबाईल, बँकिंग, मीडिया व सेवा क्षेत्रांतील 50 हून अधिक कंपन्या मेगा जॉब फेअरमध्ये सहभागी होणार आहेत.

जागतिकीकरणाच्या बदलत्या जगात आपले अढळ स्थान निर्माण करण्यासाठी व रोजगाराच्या नवीन संधी मिळविण्यासाठी जास्तीत-जास्त रोजगार इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सन्मित्र सोशल फाऊंडेशन, गारगोटीचे अध्यक्ष अलकेश कांदळकर यांनी केले आहे. मेगा जॉब फेअरमध्ये नोंदणीची 3 फेब्रुवारी अंतिम तारीख आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी उमेदवार व कंपनी प्रतिनिधी यांनी 9665242525/8600395495 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Mega Job Fair : अशी कराल नोंदणी

जॉब फेअर मध्ये नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणीसाठी https://forms.gle/B7QUAcRW1KAkwTc57 या लिंकचा वापर करावा.

तसेच कंपनी नोंदणीसाठी एच आर मॅनेजर/कंपनी प्रतिनिधी यांनी https://forms.gle/6Tz686Njmh2d14Ve9 या लिंकचा वापर करावा.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news